संकटग्रस्त महिलांसाठी "या' शहरात मोटारीची सोय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

या सेवेची गुरुवारपासून सुरुवात 
या सेवेची सुरुवात गुरुवारी (ता.12) होणार आहे. महिलांच्या सुरक्षितेसाठी हा कर्तव्य पर उपक्रम सामाजिक जाणीव म्हणून सुरू केला आहे. या save girl save nation mission ध्ये सहभागी व्हावे. नराधाम प्रवृत्ती ला वाचा फोडण्यासाठी समाजातील आपण एक जागरुक नागरिक म्हणुन आपल्याला जितके चांगले कार्य करता येईल तितकी मदत करावी. मदत हवी असल्यास 9623538999 या क्रमांकावर संपर्क करावा. 

सोलापूर ः बस मिळत नाही अथवा घरी जाण्यास वाहन नाही अशा संकटकालीन परिस्थितीत अडकलेल्या महिला व मुलींना सुरक्षित पोचविण्यासाठी सोलापुरात सेव्ह गर्ल सेव्ह नेशन मिशन या मोहिमेअंतर्गत एमर्जन्सी हेल्प नेटवर्क सुरु करण्यात आले आहे. रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संकटात सापडलेल्या महिला व मुली यांना मदत पाहिजे असल्यास किंवा घरी सोडण्यासाठी सोय केली आहे. महिलांसाठी खास मोटारीची सोय असेल व प्रत्येक वेळी सोबत महिला पोलिस असणार आहे.

हेही वाचा.... जाणून घ्या काय होऊ शकतात हैदराबाद एनकाऊंटरचे परिणाम  

हैदराबाद मध्ये नुकतेच एका डॉक्‍टर मुलीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आले. ही क्रूर घटना घडल्याने देशात महिलांमध्ये भीतीचे अन असुरक्षिततेचे वातावरण आहे. त्यांनंतर नराधमांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणी पुढे आली. पण पोलिसांनी त्यांचे एनकाऊंटर केले. या प्रकारानंतरही बलात्काराच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या. हैदराबाद घटनेतील पोलीसांचे कौतुक झाले. तरी महिलांमध्ये भीतीचे प्रमाण कायम आहे. संध्याकाळी एकटे बाहेर पडण्याआगोदर महिला दहा वेळा विचार करत आहेत. 

हेही वाचा... आठ दिवसानंतरही नाही या महापौरांना संकेतस्थळावर स्थान 

ज्यांच्या घरी सुविधा उपलब्ध आहेत त्या महिला घराबाहेर पडत नाहीत. मात्र समाजात अशा काही महिला आहेत ज्यांना कामानिमित्त घराबाहेर पडावेच लागते. पण बहुतांश ठिकाणी विशेष करून ग्रामीण भागात वाहनांची सोय नाही. त्यामुळे बाहेर पडल्या की त्यांना रात्रीचा प्रवास करणे अवघड जाते. मदत मागणे देखील जीवावर बेतू शकते. हे मागील घटनावरून दिसून आले आहे. त्यामुळे ही सोय करण्यात आली आहे. 

हे आवर्जून पहा.... उपक्रमाची माहिती (VIDEO)

ही सेवा असेल निशुल्क 
संकटग्रस्त महिला अथवा मुलीनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल केल्यास तात्काळ वाहन उपलब्ध होणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क नसणार आहे. या मोटारीत एक महिला आणि पोलिसमित्र असतील. ते त्या महिला अथवा मुलींना त्यांच्या घरी सोडण्यास मदत करतील. याचसोबत पोलिसांची देखील मदत मिळणार आहे. 
- मनोज देवकर, समन्वयक, 
महाराष्ट्र राज्य पोलिस बॉईज असोसिएशन 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle facilities in this city "for distressed women