वाऱ्यामुळे चटईत अडकलेल्या बालिकेला वाहनाने चिरडले

संजय रानभरे
रविवार, 13 मे 2018

घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) : लग्नमंडपात बालके खेळत असताना वादळ सुटल्याने चटईत अडकलेल्या बालिकेला वाहनाने चिरडल्याने ती ठार झाल्याची घटना शनिवारी (ता. १२) सायंकाळी पट्टीवडगाव (ता. अंबाजोगाई) येथे घडली. रामेश्वरी गोविंद घोडके (वय. 6) असे या बालिकेचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. रविवारी (ता. १३) बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. 

शनिवारी पट्टीवडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जुन्या इमारतीसमोर सुग्रीव कुकर यांच्या मुलीचा लग्नसोहळा होता. वऱ्हाडी मंडळीला बसण्यासाठी मंडपात प्लास्टिक चटई अंथरल्या होत्या. विवाह सोहळा संपल्यानंतर सायंकाळच्या वेळी लहान बालके मंडपात खेळत होती.

अचानक वारे आल्याने खेळत असलेली बालांच्या अंगाभोवती चटई गुंडाळली गेली. याच मंडपातून जाणाऱ्या जीपने (क्रमांक एम. एच. २० सी. एस. १३५६) चटईत गुंडाळलेल्या रामेश्वरी गोविंद घोडके या बालिकेला चिरडले. गंभीर जखमी झालेल्या रामेश्वरीला उपचारासाठी दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

रविवारी (ता. १३) रामेशवरीची उत्तरीय तपासणी करण्यात आली. बर्दापुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक अजित विसपुते करीत आहेत.

Web Title: vehicle hit the child in the mat due to the wind