esakal | वेजेगावात भीतीचे वातावरण; ग्रामपंचायतीकडून औषधांची फवारणी
sakal

बोलून बातमी शोधा

Vejegaon under corona thret; Spraying of drugs by Gram Panchayat

वेजेगाव (ता. खानापूर, जि. सांगली ) येथे बिहारमधून आलेल्या 27 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

वेजेगावात भीतीचे वातावरण; ग्रामपंचायतीकडून औषधांची फवारणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा


लेंगरे : वेजेगाव (ता. खानापूर, जि. सांगली ) येथे बिहारमधून आलेल्या 27 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

वेजेगाव देवकर मळ्यानजीकच्या वस्तीवर मंगळवारी (ता. 30) या तरुणीसह कुटुंबातील चार व्यक्तींना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांची वेजेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली होती. युवतीला घशात त्रास जाणवू लागल्याने मिरज येथील कोव्हीड रुग्णालयात हलविण्यात आले. या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिच्या संपर्कातील चौघांना विटा येथील कोव्हीड केअर केंद्रात क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी दिली. 

पंधरा दिवसांपासून येथे रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यवहार सुरळीत होत असतानाच वेजेगाव येथे रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून तत्काळ निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषीकेश शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लोखंडे, गावकामगार तलाठी अमृता कदम, कोतवाल सुनील मंडले यांनी त्या भागाची पाहणी केली. कोरोनाबाधित व्यक्ती सापडलेल्या संबंधित भागाचा नकाशानुसार कन्टेन्मेंट, बफर झोनच्या मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. त्या युवतीच्या संपर्कातील चौघांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले आहेत. 

गावात पहिलाच रुग्ण सापडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क व सॅनिटायझर वापरावे, सामाजिक अंतर राखावे, कोरोनाचा संसर्ग टाळावा, प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून लोकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार शेळके यांनी केले आहे.