esakal | महापालिकेच्या कोविड हेल्थ सेंटरमध्ये व्हेंटिलेटर बसवणार : आयुक्त नितीन कापडणीस
sakal

बोलून बातमी शोधा

covid health center.jpg

सांगली- महापालिकेच्यावतीने कोल्हापूर रोडवर सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्‍सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तेथे व्हेंटिलेटरही बसवण्यात येणार आहे. त्यामुळे कोविड रुग्णांची सोय झाली आहे. या ठिकाणी डॉक्‍टर आणि नर्सिंग स्टाफही नियुक्त करण्यात आला आहे. त्यांची कमतरता नाही, अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. 

महापालिकेच्या कोविड हेल्थ सेंटरमध्ये व्हेंटिलेटर बसवणार : आयुक्त नितीन कापडणीस

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली- महापालिकेच्यावतीने कोल्हापूर रोडवर सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्‍सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तेथे व्हेंटिलेटरही बसवण्यात येणार आहे. त्यामुळे कोविड रुग्णांची सोय झाली आहे. या ठिकाणी डॉक्‍टर आणि नर्सिंग स्टाफही नियुक्त करण्यात आला आहे. त्यांची कमतरता नाही, अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. 

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आदिसागर हॉलमध्ये आठ दिवसांत 120 बेडचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु केले. येथे ऑक्‍सिजनची बेडची सुविधा आहे. कोविड रुग्णांसाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ऑक्‍सिजनची पातळी 90 पर्यंत असलेल्या आणि कोविडची लक्षणे असलेल्या रुग्णांनाच येथे ठेवता येते. त्यांची ऑक्‍सिजन पातळी कमी होऊ लागल्यास तातडीने दुसऱ्या कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्ण पाठवण्यासाठी ऍम्ब्युलन्सही ठेवल्या आहेत. 


या हेल्थ सेंटरमध्ये व्हेंटिलेटर बसवण्याची मागणी आहे. महापालिकेच्या वतीने एक कोटी रुपयांचे व्हेंटिलेटर घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात दहा व्हेंटिलेटर घेण्यात येणार आहेत. त्यातील काही आदिसागर कोविड हेल्थ सेंटरमध्ये बसवण्यात येतील, अशी माहिती श्री. कापडणीस यांनी दिली. 

दोन रुग्णांना डिस्चार्ज 
महापालिकेच्या आदिसागर हॉलमधील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या दोघांना आज डिस्चार्ज देण्यात आला. या कोविड सेंटरमध्ये पाच दिवसात 40 रुग्ण दाखल झालेत. आज दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. 

जेवण, नाष्ट्याची सुविधा 

या हॉस्पिटलचे उद्‌घाटन गुरुवारी करण्यात आले. त्यानंतर गेल्या पाच दिवसात या ठिकाणी 40 रुग्ण दाखल करण्यात आले. यातील काही रुग्णांशी संवाद साधला असता त्यांनी जेवण, नाष्टा, चहा तसेच इतर सुविधा मिळत असल्याचे सांगितले. तसेच नर्सिंग स्टाफही वेळच्या वेळी चौकशी करुन सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. 


""महापालिकेच्या कोविड हेल्थ सेंटरमध्ये डॉक्‍टर्स, नर्सिंग तसेच टेक्‍निशियन उपलब्ध आहेत. कोणतीही अडचण नाही. लवकरच येथे व्हेंटिलेटरचीही सोय करण्यात येणार आहे. व्हेंटिलेटर वापरण्याचे प्रशिक्षणही नर्सिंग स्टाफला देण्यात येणार आहे. आयएमएशी चर्चा करुन फिजिशियन्सची नेमणूक केली आहे. त्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले आहे.'' 

-नितीन कापडणीस, आयुक्त, महापालिका 

loading image
go to top