कुलगुरूंच्या निर्णय प्रक्रियेवर येणार अंकुश.!

संदीप खांडेकर
रविवार, 4 डिसेंबर 2016

कोल्हापूर - महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्‍ट-२०१६ ची अंमलबजावणी होईतोपर्यंत कुलपती व कुलगुरू नामनिर्देशित सदस्य अधिसभेच्या कामकाजात भाग घेणार आहेत. पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्‍त नामनिर्देशित सदस्य कोण असतील, याविषयी विद्यापीठ वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. या महिन्यात सदस्यांच्या नावाची घोषणा होणार असून, यापुढे कुलगुरूंच्या निर्णय प्रक्रियेवर आपोआपच अंकुश येणार आहे. अधिसभेत या सदस्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. 

कोल्हापूर - महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्‍ट-२०१६ ची अंमलबजावणी होईतोपर्यंत कुलपती व कुलगुरू नामनिर्देशित सदस्य अधिसभेच्या कामकाजात भाग घेणार आहेत. पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्‍त नामनिर्देशित सदस्य कोण असतील, याविषयी विद्यापीठ वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. या महिन्यात सदस्यांच्या नावाची घोषणा होणार असून, यापुढे कुलगुरूंच्या निर्णय प्रक्रियेवर आपोआपच अंकुश येणार आहे. अधिसभेत या सदस्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. 

सर्वपक्षीय समन्वय समितीने विधानभवनात महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्‍टला अंतिम मान्यता दिली आहे. आता औपचारिकता म्हणून हिवाळी अधिवेशनातही ॲक्‍ट मंजूर झाल्यानंतर ॲक्‍टच्या अंमलबजावणीसाठी जुलै-ऑगस्ट २०१७ उजाडणार आहे. दरम्यानच्या काळात कुलपती व कुलगुरू नामनिर्देशित व स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर करून त्यांना कामकाजात सहभागी करून घेतले जाणार आहे. 

दीड वर्षांपूर्वी विविध अधिकार मंडळे बरखास्त झाल्यानंतर कुलगुरू, कुलसचिव, वित्त व लेखाधिकारी, शिक्षण सहसंचालक हेच विद्यापीठासंदर्भातील निर्णय घेत आहेत. त्यातून नेमके कोणते निर्णय घेतले गेले आहेत, याची माहिती विद्यापीठ वर्तुळाला मिळतेच असे नाही. मात्र, आता ती परिस्थिती उद्‌भवणार नाही. विद्यापीठाच्या फंडातून एक पै खर्च करायची झाल्यास त्याबाबतची मंजुरी सदस्यांकडून घ्यावी लागणार आहे. कुलपतींकडून नामनिर्देशित सदस्यांची नावे जाहीर झाल्यानंतर कुलगुरूंनाही नामनिर्देशित सदस्यांची नावे जाहीर करावी लागणार आहेत. या सदस्यांच्या नावांबाबत कमालीची उत्सुकता आहे. कुलपती व कुलगुरू नक्की कोणत्या व्यक्तीला पसंती देऊन अधिसभेत स्थान देतील, याकडे विद्यापीठीय संघटनांचे लक्ष लागून राहिले आहे. 

अधिसभेवर २१, मॅनेजमेंट कौन्सिल २, ॲकॅडेमिक कौन्सिल १२, तर बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटीवर तीन सदस्य नामनिर्देशित केले जाणार आहेत. यातील कुलपती नामनिर्देशित सदस्य असतील. अधिकृत संस्था, प्राध्यापक, देणगीदार, उद्योग, व्यवसाय क्षेत्र, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ज्ञ यांना सदस्यपदी नामनिर्देशित केले जाईल. अन्य अकरा सदस्य कुलगुरू नामनिर्देशित असतील. त्यात तीन विभागप्रमुख, दोन विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी, जिल्हा परिषद एक व महापालिकेतील एका सदस्याचा समावेश असेल. विशेष म्हणजे मॅनेजमेंट कौन्सिलवर नामनिर्देशित होणारे सदस्य उच्च पदस्थ असतील. ज्यांचा निर्णय प्रक्रियेत त्यांचे स्थान महत्त्वाचे असणार आहे. या विषयी बीसीयूडीचे संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी येत्या आठ दिवसांत सदस्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्‍यता असल्याचे सांगितले. 

नामनिर्देशित सदस्य संख्या अशी  -
अधिसभा - २१
मॅनेजमेंट कौन्सिल - २
ॲकॅडेमिक कौन्सिल -१२
बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी -३


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vice chancellor of will to curb the process of decision-making.!