तुंग येथे बाधिताची पत्नी पॉझिटिव्ह; संपर्कातील सात जण निगेटिव्ह

बाळासो गणे 
Monday, 27 July 2020

तुंग : येथे 28 वर्षीय कोरोना बाधिताच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दोन झाली.

तुंग : येथे 28 वर्षीय कोरोना बाधिताच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दोन झाली. संपर्कातील आठ पैकी सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत. गावात प्रशासनाने औषध फवारणी सुरू केली. सर्व व्यवहार बंद ठेवलेत. 

सिव्हिलमध्ये कार्यरत कसबे डिग्रज येथील परिचारिकेचा 42 वर्षीय पती व 14 वर्षीय पुतणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या तीन झाली. अकरा पैकी नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत. संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने औषध फवारणी करून दक्षतेची सूचना केली आहे. 

समडोळी येथील 78 वर्षीय व्यक्तीचा कोरोना व निमोनियामुळे मृत्यू झाला. 54 वर्षीय बाधित बॅंक कर्मचाऱ्याची 45 वर्षिय पत्नी, 22 वर्षिय मुलगी कोरोना बाधित आढळल्यात. समडोळीतील बाधितांची संख्या तीन झाली आहे. कंटेंटमेंट झोनमध्ये ग्रामपंचायत व चावडी कार्यालय येत असल्याने संस्थांचा कारभार हायस्कूलमधून सुरू आहे.  सहा दिवसाचा बंद संपल्याने व्यवहार उद्यापासून सुरू करण्यात येत आहेत. आरोग्य अधिकारी डॉ. युवराज मगदूम व ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मौजे डिग्रज येथे पुन्हा कोरोना बाधित रुग्ण सापडला. गोमटेशनगर येथील 50 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. संपर्क व हाय रिस्कमधील 11 पैकी चार जणांना संस्थात्मक क्वारंटाईनस, सात जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. बाधिताला मिरज शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसर कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. ग्रामपंचायत, आरोग्य सुपरवायझर चेतन सूर्यवंशी व टीमने तपासणी मोहीम सुरू केली. 

दुधगाव येथील आरोग्य सेवकाच्या संपर्कातील पत्नी, मुलगा, भाची व आत्या असे चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेत कंटेनमेंट झोन वाढवून औषध फवारणी सुरू करीत दक्षतेच्या सूचना केल्या आहेत. कवठेपिरान प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. युवराज मगदूम व पथकांने आरोग्य तपासणी सुरू केली. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Victim's wife positive at Tung