
अकोले : कोरोनाने सर्वांना घेरले आहे. वाडी, पाडा, वस्तीतील आदिवासी ठाकर , कातकरीदेखील कोरोनामुळे संकटात सापडले आहेत. मात्र, कोरोना आपल्या येणार नाही यासाठी त्यांच्याकडे एक जुना फंडा आहे. तो म्हणजे जंगलातील कंदमुळे खायला सुरूवात केली आहे. या कंदमुळांमुळे कोरोनापासून बचाव तर होईलच परंतु पोटाची भूकही भागत आहे. मलेरिया, कॉलरा, पटकीसारखे आजार या जंगली वनस्पतींनी पळून लावले. कोरोनावर ही वनस्पती जालिम आहे. ती खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते. आदिवासी पिढीजात त्याचाच उपयोग करीत आले आहेत.
आजार पळून जातात
निसर्ग देवतेचे आम्ही पूजक असून निसर्ग आमचा पालनहार आहे. संकटसमयी तो आम्हाला जंगलातील कंदमुळे खायला घालून आमचे प्राण वाचविल याची आम्हाला खात्री असल्याचे सखाराम गांगड यांनी छातीठोकपणे सांगतात. आदिवासींचे पूर्वज अन्न म्हणून जंगलातील वनस्पती शोधून त्याचे खायचे आणि पोटाची भूक भागवायचे. त्या कंदमुळांमुळे शरीरातील विविध आजारही पळून जातात, असा त्यांचा दावा आहे.
काय उपयोग होतो त्याचा
वनस्पतींपैकी कवदर ही एक वनस्पती होय. कडेकपारीत ही वनस्पती आढळते. तिची पाने केळीसारखी असतात. त्यामुळे तिला रानकेळी म्हणतात. ती कॉलरा, किडनी, व्यसनी लोकांना व्यसन सोडविण्यासाठी गुणकारी औषध आहे. काही असाध्य रोगही बरे करण्याची ताकद या वनस्पतीमध्ये असल्याचे इथली आदिवासी ठाकर सांगतात. हे खाल्ल्याने दोन सांजा भूक पुढे ढकलता येते.
गेल्या महिनाभरापासून लॉक डाऊन असल्याने घराबाहेर व शहरात जाणे शक्य नाही. भाजीपाला अन्न धान्य, किराणा नसल्याने परवड होत आहे. सरकारने ५ किलो तांदूळ दिले. त्यामुळे केवळ गरम पाण्यात उकळून पोरांना दिल्याचे आदिवासी सांगतात.
असं शिजवतात कवदार
उडदवणे येथील सखाराम बुवाजी, शांताराम केवारी, नवसू लोटे , कळू घोगरे , देवजी घोगरे यांनी दिस उजाडता जंगलाची वाट धरली. कड्यावर उगवलेले कवदर कापून आणले. त्यासाठी ५ फुटाचा खड्डा केला. खड्ड्यात दगडाची माचण केली. त्यात लाकूड टाकून आग लावली. त्यात ६ कवदर टाकून त्यावर जांभूळ पाला टाकला व त्यावर माती टाकून ४ दिवस ते गाडून ठेवले. नंतर काढून वाडीतील माणसांना बोलावून ते खाल्ले.
कोरोनाची भीती नाही पण
उन्हाळ्यात हे कवदर वाळवून ते परिपकव शिजून त्याचा अन्न म्हणून उपयोग केला जातो. आमच्या पूर्वजांनी हेच वनस्पती खाऊन शरीर कमावलं आजार संपुष्टात आणले. आमची पिढी तेच करते. आमची पुढची पिढी याच पावलावर पाऊल ठेवून या वनस्पतीचे जतन करून आपले आरोग्य सांभाळतील. आम्हाला त्यामुळे कोरोनाची भीती अजिबात नाही. परंतु सरकारी आदेश पाळून घरातच आहे. मात्र, आदिवासी विभागाने आदिवासींसाठी सरकारी मदत देऊन सहकार्य करावे, असे बुवाजी गांगड यांनी ठणकावून सांगितले.
निसर्गच आमचा पाठिराखा
आमचे वडील स्वर्गीय ठकाबाबा यांनी आम्हाला जंगलातील वनस्पती खा व तंदुरुस्त राहा हे शिकविले आमची वयोवृद्ध आई ममताबाई गांगड हिची हीच शिकवण व आमचा पालक पोशिंदा निसर्गराजा त्यामुळे आमच्या गावाला कोरोनाच काय कोणतंच आजार येणार नाही, असेही बुवाजी म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.