Vidhan Sabha 2019 : सोलापुर जिल्ह्यात दोन ठिकाणी राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचेच आव्हान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

गणपतरावांच्या उत्तराधिकाऱ्यालाही पाठिंबा
सांगोल्यात अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी गणपतराव देशमुख यांचे उत्तराधिकारी म्हणून, अनिकेत देशमुख यांना शेकापने उमेदवारी जाहीर केली आहे. पण, म्हणून, राष्ट्रवादीने आपली पाठिंब्याची भूमिका बदललेली नाही. त्यांनी देशमुख यांनाच आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

सोलापूर : राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरीला शमवून युतीसमोर आव्हान उभे केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात मात्र, पक्षातील नेत्यांच्याच आव्हानाचा सामना करावा लागत आहे. करमाळा आणि सांगोल मतदारसंघातील गणिते राज्यातील इतर मतदारसंघांपेक्षा वेगळी आहेत. याबाबत पक्षाचे नेते अजित पवार यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या. सोलापूर जिल्हयात मात्र राष्ट्रवादीच्या विरोधात राष्ट्रवादीच असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीनेच जाहीर केलेल्या दोन उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेण्याची नामुष्की पक्षावर ओढवली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर मात्र, दोन्ही उमेदवारांची अडचण झाली आहे.

काय घडले कसे घडले?
करमाळा येथे राष्ट्रवादीने संजय पाटील यांना तर, सांगोल्यातून माजी आमदार दीपक साळुंखे यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. दरम्यान उमेदवारी अर्ज  मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अजित पवार यांनी करमाळा आणि सांगोल्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा राष्ट्रवादी पक्षाशी कोणताही संबंध नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे करमाळयातील अपक्ष उमेदवार  संजय पाटील आणि सांगोल्यातील शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुखांना राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याचे जाहीर केले. दोन मतदारसंघांमधअये पक्षाच्याच उमेदवारांच्या विरोधात नेत्यांना भूमिका घेण्याची नामुष्की ओढवली आहे. अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर करमाळयातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील आणि सांगोल्यातील उमेदवार दीपक साळुंखे यांना विचारले असता त्यांनी  कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि उमेदवारांची ऐन निवडणुकीत वेगवेगळी भूमिका असल्याने सर्वसामान्य मतदार ही अचंबित झाले आहेत. 

गणपतरावांच्या उत्तराधिकाऱ्यालाही पाठिंबा
सांगोल्यात अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी गणपतराव देशमुख यांचे उत्तराधिकारी म्हणून, अनिकेत देशमुख यांना शेकापने उमेदवारी जाहीर केली आहे. पण, म्हणून, राष्ट्रवादीने आपली पाठिंब्याची भूमिका बदललेली नाही. त्यांनी देशमुख यांनाच आपला पाठिंबा जाहीर केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 ncp vs ncp political situation in karmala and sangola