Vidhan Sabha 2019 : समरजितसिंह घाटगेंची कागलमध्ये कोंडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - विधानसभेसाठी युतीबाबत भाजपची दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कागलमधून माजी आमदार संजय घाटगे यांना शिवसेनेचा एबी फॉर्म मिळाला आहे. त्यामुळे कागल मतदारसंघासाठी शिवसेनेकडून संजय घाटगे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयामुळे म्हाडा (पुणे) व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची मोठी अडचण झाली.

कोल्हापूर - विधानसभेसाठी युतीबाबत भाजपची दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कागलमधून माजी आमदार संजय घाटगे यांना शिवसेनेचा एबी फॉर्म मिळाला आहे. त्यामुळे कागल मतदारसंघासाठी शिवसेनेकडून संजय घाटगे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयामुळे म्हाडा (पुणे) व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची मोठी अडचण झाली. विधानसभेसाठी ते भाजपकडून इच्छुक आहेत. गेली तीन-चार वर्षे ते कागल मतदारसंघात सक्रिय आहेत.

दरम्यान, शिवसेनेकडून जाहीर झालेल्या संजय घाटगे यांच्या उमेदवारीचे कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांच्या आतषबाजीने स्वागत केले. शिवसेनेच्या निर्णयामुळे आता समजरजितसिंह घाटगे यांच्यासमोर दोन पर्यायांची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश करावा, अन्यथा अपक्ष म्हणून रिंगणात उतरावे. शिवसेनेत प्रवेश केला तरी आता एबी फॉर्म संजय घाटगे यांना दिल्याने हा पर्याय अवघड आहे. अपक्ष म्हणून रिंगणात उतरले तरी युती धर्म म्हणून भाजप कितपत साथ देईल, हे सांगणेही कठीण झाले आहे. एकूणच समरजितसिंह घाटगे यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. समरजितसिंह घाटगे यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कागलमध्ये त्यांनी काढलेल्या परिवर्तन संकल्प यात्रेमध्ये शिवसेनेचा, भाजपचा व आरपीआयचा उमेदवार मीच असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. कागलची जागा भाजपला मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील आग्रही होते. मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत ‘कागलचा पुढील आमदार समरजितसिंह घाटगे असतील’, असे जाहीर केले होते, मात्र आज शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांनी सेनेकडून संजय घाटगे यांची उमेदवारी जाहीर केली. गेली वीस वर्षे राष्ट्रवादी पक्षाचे हसन मुश्रीफ हे कागलचे आमदार आहेत. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी शिवसेनेचे संजय घाटगे व भाजपचे समरजितसिंह घाटगे हे दोघेही इच्छुक होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 No chance to Samarjeetsingh Ghatge in Kagal