Vidhan Sabha 2019 : सदाभाऊ खोत यांच्या 'रयत'ला महायुतीत 'या' दोन जागा

शांताराम पाटील
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

इस्लामपूर - महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला चार जागा हव्या आहेत. त्यातील दोन जागा त्यांना मिळाल्या असून दोन जागाबाबत अद्याप निर्णय बाकी आहे. 

याबाबत माहिती देताना श्री. खोत म्हणाले, रयत क्रांती संघटनेला शिवसेना भाजप महायुतीत अक्कलकोट व पंढरपूर हे दोन मतदार संघ सुटले आहेत, तर अजून साक्री व फलटण या दोन जागांवर रयत क्रांती संघटनेने दावा सांगितला आहे. या दोन्ही जागा आम्हाला मिळतील असा विश्वास यावेळी श्री. खोत यांनी व्यक्त केला.  

खोत यांनी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना फोडून रयत क्रांती संघटनेत घेतल्याने खोत यांचे राज्यपातळीवर भाजपच्या गोटात जोरदार स्वागत झाले होते. त्यामुळे आणखी काही जागा रयत क्रांती संघटनेच्या पदरात पडु शकतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Two seats to Sadhabhau Khot Rayat Kranti