Vidhansabha 2019 : विखे-थोरातांच्या संघर्षामुळे चुरस

Shirdi-Constituency
Shirdi-Constituency

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. विखेंमुळे भाजपला ताकद मिळण्याची चर्चा आहे. थोरातांनादेखील आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. या दिग्गजांच्या संघर्षामुळे बहुतांश विधानसभा मतदारसंघात या वेळी प्रथमच टोकाची चुरस असेल. 

अकोल्यात आमदार वैभव पिचड यांनी गेल्या वेळी अनेक विरोधी उमेदवार निर्माण करण्यात यश मिळवले होते. मतविभागणी करून अलगदपणे निवडून येण्याचा त्यांचा फंडा या वेळीही यशस्वी होईल का, याबाबत उत्सुकता आहे. संगमनेरमध्ये थोरात यांनी सक्षम विरोधक निर्माण होऊ दिला नाही. गेल्या वेळेपेक्षा विक्रमी मताधिक्‍याचा त्यांचा प्रयत्न असेल. अर्थात, विखे हेही संगमनेरमध्ये शक्ती पणाला लावतील. थोरातही शिर्डीत विखेंना शह देण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे संगमनेर आणि शिर्डी या मतदारसंघांकडे लक्ष असेल. 

कोपरगावात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची संभाव्य उमेदवारी आमदार स्नेहलता कोल्हे आणि आशुतोष काळे यांच्यापैकी कोणाला फायदेशीर ठरेल, यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. श्रीरामपूर या राखीव मतदारसंघात लोकसभेच्या रिंगणातील भाऊसाहेब वाकचौरे आणि भाऊसाहेब कांबळे यांच्यासह भाजप व काँग्रेसकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. राखीव असूनही या मतदारसंघात चांगली चुरस राहील, असे चित्र आहे. नेवाशात शंकरराव गडाख या वेळीही क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या तिकिटावर लढतील. तेथे त्यांना आमदार बाळासाहेब मुरकुटे, साहेबराव घाडगे, पांडुरंग अभंग, विठ्ठल लंघे यांच्यापैकी दोघांशी सामना करावा लागणार आहे. चंद्रशेखर घुले नेवाशात किती लक्ष घालतील, यावरही बरेच काही अवलंबून आहे.

असे आहेत पक्षनिहाय इच्छुक 
भाजप -
 स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. वसंत जमधाडे, बाळासाहेब तोरणे, राजेश चौधरी, साहेबराव नवले, शाळिग्राम होडगर, राजेंद्र रहाणे, अशोक भांगरे, सुनीता भांगरे, डॉ. राजेंद्र पिपाडा, विजय वहाडणे. 

काँग्रेस - बाळासाहेब थोरात, भानुदास मुरकुटे, हेमंत ओगले, बाळासाहेब देशमुख, लहू कानडे, भाऊसाहेब कांबळे, ॲड. संतोष कांबळे.

राष्ट्रवादी - वैभव पिचड, आबासाहेब थोरात, पांडुरंग अभंग, विठ्ठल लंघे, अभय शेळके, भानुदास मुरकुटे, आशुतोष काळे. 

शिवसेना - डॉ. किरण लहामटे, मधुकर तळपाडे, सतीश भांगरे, शिवाजी धुमाळ, बाबासाहेब कुटे, जनार्दन आहेर, रामदास गोल्हार, साहेबराव घाडगे, कमलाकर कोते, प्रमोद लबडे, राजेंद्र झावरे. 

वंचित आघाडी - संजय सुखदान, डॉ. अरुण साबळे, डॉ. सुधीर साबळे, बापूसाहेब रणधीर, गणपत देशमुख. 

क्रांतिकारी शेतकरी पक्ष - शंकरराव गडाख.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com