"महिलांनो घाबरू नका, मदतीसाठी आता या नंबरवर संपर्क करा' 

vijaya rahatkar speech in sangli.gif
vijaya rahatkar speech in sangli.gif
Updated on

सांगली ः महिलांनी जीवनातील समस्या, अत्याचार यामुळे निराश, हतबल न होता महिला आयोगाची मदत घ्यावी. राज्य महिला आयोग अन्याय, अत्याचार पिडित महिलांच्या जखमांवर मातेच्या ममतेने फुंकर घालण्याचे काम करीत आहे. कोणताही प्रसंग तुमच्यावर ओढवल्यास तुम्हाला तातडीचा निवारा, वैद्यकीय सेवा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, पोलिस सहाय्य यासाठी शासनाने सखी मदत केंद्र सुरू केले आहे. महिलांनी त्वरीत मदतीसाठी या सीएम हेल्पलाईनच्या १८१ या नंबरवर संपर्क साधावा. त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून दिली जाईल.असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले. महिलांना देण्यात येणारे दुय्यम स्थान हेच महिलांवरील अत्याचाराला कारण ठरत आहे. राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली सांगलीत झाली. यावेळी त्या बोलत होत्या.

जनसुनावणीला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी सुमारे 70 प्रकरणांवर सुनावणी झाली. राज्य महिला आयोगाने डिजीटल साक्षरता हा उपक्रम हाती घेतला असून या माध्यमातून महिलांना दैनंदिन जीवनात आवश्‍यक असणारे डिजीटल ज्ञान देण्यासाठी पाचशे संस्थांच्या माध्यमातून राज्यभरात एक लाख महिलांना डिजीटल साक्षर करण्यात येत आहे. याला ग्रामीण भागात महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. 
रहाटकर म्हणाल्या, जीवनात येणाऱ्या समस्यामुळे निराश होवू नका. तसेच अन्याय, अत्याचार सहन करू नका. अत्याचारग्रस्त महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी महिला आयोग आपल्या दारी उपक्रम राबवला जातो आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्‍य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे.' 
त्या म्हणाल्या, पूर्वीच्या तुलनेत आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात दाद मागण्यासाठी महिला आता पुढे येत असून कायद्याबद्दल जाणीवजागृती वाढत आहे. विद्यापीठे, महाविद्यालये, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून कायद्यांबाबत जाणीवजागृतीवर अधिकाधिक भर देण्यात येत आहे. 
आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती विश्वास माने, नीता केळकर, उपजिल्हाधिकारी विजया यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक वीरकर, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा महिला विकास अधिकारी सुवर्णा पवार, विधी अधिकारी डी. पी. बोराडे, जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील प्रमुख उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com