इस्लामपूर/इटकरे : अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक, मराठा आरक्षण (Maratha Reservation) समन्वय समितीचे राज्याध्यक्ष, तसेच जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे संस्थापक विजयसिंह महाडिक (वय ६५) यांचा आज येथे राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. काल सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वाघवाडी रस्त्यावरील अभियंतानगरमध्ये ही घटना घडली.