राष्ट्रवादीचे मंत्री मुश्रीफ म्हणाले, विखे पाटील तर आमचेच.. चर्चा तर होणारच

Vikhe Patil will be in our favor soon
Vikhe Patil will be in our favor soon

नगर ः भाजप सरकारने नोकरभरती केली नाही. मात्र, त्यांनी फक्त राजकीय मेगाभरती करून वेड्यात काढण्याचे काम केले. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार लवकरच नोकरदारांची मेगाभरती करणार आहे. तसेच गेलेले परतत आहेत.

विखे पाटील हे आमच्याच विचारांचे आहेत. ते तिकडे रमलेले नाहीत, लवकरच आमच्याकडे येतील, असेही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हणाले. आगामी 15 वर्ष सरकार पडणार नसल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. 

कुठे बोलले ते असं... 
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात प्रशासनातील विविध खाते प्रमुखांची बैठक आज (शुक्रवार) पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी आदी उपस्थित होते.

सध्या विखे पाटील यांच्या अस्वस्थतेच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री मुश्रीफ यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या शेजारीच खासदार सुजय विखे पाटील होते. त्यांनी मात्र, याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. 

निधी अखर्चित राहणार नाही 
मुश्रीफ म्हणाले, सन 2019-20 या आर्थिक वर्षातील उर्वरित 40 टक्के निधी येत्या 31 मार्चपर्यंत अखर्चित राहता कामा नये, अशा सूचना दिल्या आहे. नियोजनचा निधी 100 टक्के खर्च करण्यामध्ये जिल्हा यंदाही राज्यात अव्वल राहील. आगामी आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन आराखड्यात सुमारे शंभर कोटींचा वाढीव निधी मिळाला आहे. त्यातून जिल्ह्याचा विकास केला जाईल.

कर्जमुक्ती योजनेद्वारे नियमित फेड करणाऱ्या तसेच दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना सरकारकडून दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पालकमंत्री म्हणून प्रत्येक महिन्याला आपला जिल्हा दौरा असणार असणार आहे. 

सरपंच निवडीचा निर्णय ठाम 
सरपंच निवडीसंदर्भात ठरावावर राज्यपालांनी स्वाक्षरी न करता पुन्हा सरकारकडे पाठवला. परंतु, सदस्यांतून सरपंच निवडीसाठी महाविकास आघाडीचे सरकार ठाम आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सदस्यातून सरपंचाची निवड या विषयी कायद्यात रुपांतर केले जाणार आहे. 

खऱ्या गरजूंना खाऊ द्या शिवभोजन 
शिवभोजन योजनेला गरजूंचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. परंतु ही योजना दोन वेळेसचे जेवण मिळण्याची ज्याला चिंता आहे, अशा गरजूंनाच शिवभोजन थाळीचा लाभ घेऊ द्या, ऐपतदारांनी याचा लाभ घेऊ नये, असे आवाहन पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले. 

जिल्ह्याचा कायापालट करणार 
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपणाकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. ती प्रामाणिक पार पाडून शहरासह जिल्ह्याचा कायापालट करू, सर्वच कामात जिल्हा राज्यात कायमच आघाडीवर राहील, यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com