भिलवडीत 12 हजाराची लाच घेताना ग्रामविकास अधिकाऱ्यास अटक 

सतीश तोडकर
Friday, 11 September 2020

भिलवडी (सांगली)- बांधकामाच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी ठेकेदाराकडून 12 हजार रूपयाची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी राजेंद्र दिनकर पाटील( वय 49, रा. दत्तनगर, कापुसखेड ता. वाळवा) याला सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. लाचखोर पाटील विरूद्‌ध भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भिलवडी (सांगली)- बांधकामाच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी ठेकेदाराकडून 12 हजार रूपयाची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी राजेंद्र दिनकर पाटील( वय 49, रा. दत्तनगर, कापुसखेड ता. वाळवा) याला सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. लाचखोर पाटील विरूद्‌ध भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी, भिलवडी ग्रामपंचायतीच्या जनसुविधा योजनेअंतर्गत मुस्लिम समाज दफनभूमी शेडच्या दुरूस्तीसाठी तक्रारदार यांनी निविदा भरली होती. सदरचे काम त्यांना मिळाले होते. तक्रारदार यांना त्यासाठी सुमारे चार लाख रुपयांचा खर्च आला होता. कामाच्या बिलाचा धनादेश अद्यापपर्यंत तक्रारदार यांना मिळाला नव्हता. ते वारंवार चौकशी करत होते. धनादेश काढण्यासाठी ग्रामविकास अधिकारी पाटील याने तीन टक्के प्रमाणे बारा हजार रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे 10 सप्टेंबर रोजी केली होती. तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. तेव्हा पाटील याने धनादेश काढण्यासाठी 12 हजार रूपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. 

लाचेची रक्कम आज देण्याचे ठरले होते. त्यानुसार आज दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडुन बारा हजाराची रक्कम स्विकारताना पाटील याला रंगेहात पकडले. त्याच्याविरूद्‌ध भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच सायंकाळी एका पथकाने कापूसखेड येथे पाटील याच्या घराची झडती घेतली. उद्या पाटील याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाडगे, निरिक्षक प्रशांत चौगुले, गुरुदत्त मोरे, कर्मचारी अविनाश सागर, सोहेल मुल्ला, संजय संकपाळ, भास्कर मोरे, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, सलीम मकानदार, सिमा माने, राधिका माने, अजित पाटील, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village Development Officer arrested while accepting bribe of Rs 12,000 in Bhilwadi