क्रांतीकारकांचे "बिळाशी' गाव "कोरोना'ला थोपवतेय एकसंधपणे... वाचा

bilashi village.jpeg
bilashi village.jpeg

बिळाशी(सांगली)- राज्यात कोरोना विषाणूच्या महामारीने घातलेल्या थैमानाला सामथ्याने एकसंधपणे लढा देण्यासाठी सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्‍यातील 'क्रांतीकारकांचे गाव म्हणून पाश्वभूमी असणारे बिळाशी गाव "कोरोना' विषाणूच्या महामारीला हरविण्यासाठी एक झाला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून गावाचा बचाव होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सारे गाव घरात, रानात, शेतात, अत्यावश्‍यक सेवेसाठी घरातून बाहेर पडताना लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत जवळपास 5000 ग्रामस्थ "मास्क'चा वापर करत आहे. 

निगडी (ता.शिराळा ) येथे काही दिवसांपूर्वी दोन कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने तालुक्‍यातील गावांमध्ये भीतीदायक वातावरण झाले असताना 'बिळाशी' गावात मात्र अनेक दिवसांपासून ग्रामपंचायत पदाधिकारी, कोरोना जनजागृती समर्थक युवक, नागरिक घरोघरी जाऊन "चिंता करु नका, नीट काळजी घ्या' असे आवाहन करत 'कोरोना' विरूद्ध लढण्यासाठी ग्रामस्थांचे मनोधैर्यच वाढवत आहेत. 


केंद्र, राज्य प्रशासनासह पोलीस, आरोग्य प्रशासनाने केलेल्या सुचनांचे गावात काटेकोरपणे पालन केले जाते. उच्च प्रतीचे मास्क बनविण्यासाठी जवळपास लागणा-या पन्नास हजार रकमेची तरतुद गावातील वैद्यकीय सेवा देणारे डॉक्‍टर्स, अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, आजी-माजी शिक्षक, गावातील बारा बलुतेदार संघटना, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सहकार्यातून झाली. बिळाशीला कार्यरत असणारे ग्रामसेवक पी.एम.पाटील, चंद्रपूर चे वन अधिकारी राहुल पाटील आदींनी अनेकांना मास्कचे वाटप केले आहे. 


गावात सध्या एकही नागरिक, शालेय मुले, विना "मास्क' गावात वावरत नाहीत. तसेच कोणाला "मास्क' वापरा हा सल्लाही द्यावा लागत नाही. बहिस्त कोणतेही भाजीपाला विक्रेते गावात येत नाहीत. स्थानिक शेतकरी बांधवांनी उत्पादीत केलेला भाजीपाला गावात अगदी रास्त भावात शारिरीक अंतर ठेवून गावच्या बाजारपेठेत विकला जातो. प्रत्येक घरातील एकच नागरिक भाजीपाला खरेदीला बाहेर पडतो. "कोरोना' समितीच्या अध्यक्षा पुजा साळुंखे, सरपंच गीता साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सारा गाव "कोरोना' दक्ष असून येथे भयमुक्त वातावरण आहे. 

सैनिक, पोलीस मदतीला सरसावले.... 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावात घरोघरी "मास्क' वाटपाच्या उपक्रमास "मुंबई' चे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पाटील, हवालदार आनंदा भोसले, अमर पाटील, सेवा निवृत्त पोलीस अशोक भोसले, भारतीय सैन्यदलातील जवान किसन पाटील, अनिल साळुंखे यांनीही आर्थिक योगदान दिले. 



 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com