गावाकडची वाट बंद... शहरात गेलात ना आता तिकडंच रहायचं... कोरोना घेतला माणुसकीचा बळी

सनी सोनावळे
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोना आता जीवाभावाच्या नात्यांवर उठला आहे. एक भाऊ शहरात तर दुसरा गावात अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही दरी कधी कमी होते, हे सांगता येणंही कठीण झालं आहे. पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक व शिरापूर गावांच्या शिवेवर हा प्रकार घडला आहे.

टाकळी ढोकेश्वर - कोरोना आता आपले रंग दाखवायला सुरूवात केली आहे. पैशा-पाण्यासाठी गाव सोडून गेलेले लोक परतू लागले आहेत. मात्र, ही महामारी गावात आणू नका. आधी गावा सोडून गेलात ना शहरात, परदेशात आता तिकडंच रहा. तिकडची ब्याद गावात आणू नका. उगाच आमच्या जीवाला घोर लावू असे विनवणी गाववाले करीत आहेत. तरीही लोकांचा लोंढा गावाकडं यायचा थांबलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी रस्ते उखडून टाकायला सुरूवात केली आहे. काहीजणांनी रस्त्यात काटे अंथरले आहेत.

कोरोना आता जीवाभावाच्या नात्यांवर उठला आहे. एक भाऊ शहरात तर दुसरा गावात अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही दरी कधी कमी होते, हे सांगता येणंही कठीण झालं आहे. पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक व शिरापूर गावांच्या शिवेवर हा प्रकार घडला आहे.

कोरोना आजाराच्या प्रसारासाठी अटकाव म्हणून राज्य सरकारने संपुर्ण राज्यात (ता.२३) पासून संचारबंदी लागू केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर पोलीस प्रशासन आपल्याला दिलेल्या अधिकारा प्रमाणे शहरात व ग्रामीण भागात काम करत आहेत. मात्र शहराप्रमाणे ग्रामीण भागातही लोकं प्रवास करण्याचे टाळत नसून गाफीलपणे दुचाकीवर विनाकारण घराबाहेर पडत आहेत. यावर अटकाव आणण्यासाठी पारनेर तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये गावकरी कुणी प्रवाशी गावात येऊ नये म्हणून बाभळीचे फास रस्त्यावर टाकत आहेत. यात पारनेर तालुक्यातील 
वडनेर बुद्रुक व शिरापुर गावाच्या बाबर मळा येथील ग्रामस्थांनी प्रथम पुढाकार घेऊन थेट रस्तेच बंद करण्याचे ठरवलेत.हे पाहून इतर गावांनीही पुढाकार घेऊन रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.तर काही कच्चे रस्ते जेसीबी च्या साहाय्याने खणून ठेवले जात आहेत.

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेने प्रशासनाच्या मुख्य नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.तरच सर्व ह्या आजारातून बाहेर पडू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The villagers blocked the road for the people of the city