त्या गावाची अडीच महिन्यांची मेहनत वाया गेली ; वाचा काय झाले?

 That villagers two and a half months of hard work got wasted
That villagers two and a half months of hard work got wasted
Updated on

मिरज (जि . सांगली ) : अडीच महिन्यांपासून सोनीमध्ये कारभाऱ्यांनी पूर्ण खबरदारी घेऊन कोरोनास गावाबाहेरच थोपवले. परंतु ठाण्याहून आलेल्या या 29 वर्षाच्या मद्यपी तरुणाने मात्र कारभा-यांची सगळी मेहनत वाया घालवली. दोन दिवसांपूर्वी तो गावात येताच त्याला होम क्वॉरंटाईन होण्यास सांगितले. तरीही मद्यपी तरुण दारूच्या नशेत गावात फिरू लागला. पुन्हा इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करण्यात आले. तेथूनही तो पळून गावात आला. त्यानंतर आज अहवाल पॉझिटिव आल्याने सक्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध पोलिस आणि आरोग्य यंत्रणेस घ्यावा लागत आहे. 

कोरोना रूग्ण सापडलेला परिसर सोनीत केला सील 

सोनी : ठाण्याहून सोनी येथे अनधिकृतपणे आलेल्या 39 वर्षीय पुरूषाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे प्रशासनाने रूग्ण सापडलेला परिसर सील केला. रूग्णाशी जवळचा संपर्क आलेल्या सात जणांना मिरजेतील कोरोना रूग्णालयातील इंस्टिट्युशनल क्वारंटाईम करण्यात आले. सील केलेल्या परिसरात अत्यावश्‍यक सेवा वगळता पुढील 14 दिवस कोणालाच प्रवेश दिला जाणार नाही. आरोग्य विभागकडून गावात आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. ग्रामपंचायतीने औषधे फवारणी केली. 

राज्यासह मुंबई येथे कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असताना सोनी येथे ठाण्याहून 39 वर्षीय तरूण 9 जून रोजी अनधिकृतपणे कुपवाड येथे येऊन नातेवाईकांसोबत चर्चा करून दुचाकीने गावात आला. दुस-या दिवशी सकाळी गावात वार्ड क्रमांक एकमध्ये फिरत असताना तरूणांच्या निदर्शनास आले. प्राथमिक माहिती नुसार त्यांने मद्यपान केले होते. त्याच अवस्थेत मित्रमंडळींची भेट घेतली. गावभर फेरी मारली. काहींना तो ठाण्याहून गावी आल्याचा संशय आल्याने कोरोना समितीस कल्पना दिली. त्याला मित्रांनी मिरज कोरोना रूग्णालयात तपासणीसाठी दाखल केले. मित्रांची नजर चुकवून पुन्हा तो गावी आला. आरोग्य सेवक सुनिल नरूटे यांच्या सतर्कतेमुळे तो सापडला. कोरोना रूग्णालयातील रूग्णवाहिकेतून त्याला मिरजेच्या कोविड रूग्णालयात दाखल करून तपासणी करण्यात आली. त्याचा आवहाल पॉझिटीव्ह आला आहे. 

मुंबई कनेक्‍शन 

मिरज तालुक्‍यात सांगली वगळता मालगावनंतर सोनी येथे दुसरा रूग्णात सापडला आहे. त्यांचा इतिहास पाहिला तर या दोन्ही रूग्णांचे कनेक्‍शन मुंबई असल्याचे स्पष्ट दिसते. 

गावाची नियमित तपासणी केली जाणार

कोरोना समितीची बैठक झाली. पुढील तीन दिवस गाव शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोग्य विभाग, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकांकडून गावाची नियमित तपासणी केली जाणार आहे.'' 
- राजेंद्र माळी, सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com