कोरोनाबाबत चांगले काम झालेल्या गावांना मिळणार बक्षीस 

शिवाजी चौगुले 
Wednesday, 7 October 2020

कोरोना बाधित रुग्ण वाढू नयेत व रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी कोरोना सुरक्षित ग्राम मोहीम नागरिक, पदाधिकारी व प्रशासन यांच्या समन्वयातून चांगल्या पध्दतीने राबवावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. 

शिराळा : कोरोना बाधित रुग्ण वाढू नयेत व रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी कोरोना सुरक्षित ग्राम मोहीम नागरिक, पदाधिकारी व प्रशासन यांच्या समन्वयातून चांगल्या पध्दतीने राबवावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. 

अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी कोरोना सुरक्षित ग्राम मोहिम उद्‌घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ अनिल बागल यांची प्रमुख उपस्थिती होती. डुडी म्हणाले, कोरोनासाठी जनजागृती करावी आणि मास्क, सॅनिटीझर, सोशल डिस्टन्संची अंमलबजावणी करावी. 

आरोग्य विभागाने कोरोनाची माहिती तयार करून लवकर निदान व उपचार करावेत. अँटिजेन व आर. टी. पी. सी. आर. चाचण्या घ्या. तालुक्‍यात तीन क्रमांक काढणार आहे. चांगले काम झालेल्या गावांना बक्षीस देण्यात येणार आहे. यामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारीचे मूल्यांकन होणार आहे. या मोहिमेचे अध्यक्ष गटविकास अधिकारी, सचिव तालुका आरोग्य अधिकारी ,गट शिक्षण अधिकारी, बाल विकास अधिकारी सदस्य असतील यामध्ये गावकऱ्यांचा व पदाधिकारी यांचा समावेश असणार आहे. 

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश राजमाने, विस्तार अधिकारी दीपक चिलवंत, सरपंच तेजस गावडे, उपसरपंच राजेश चव्हाण, ग्रामसेवक इंगवले, तलाठी संजय यादव, पोलीस पाटील शंकर वडार, सुनील पाटील उपस्थित होते.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villages that have done well in Corona will be rewarded