कंटेन्मेंट झोनचे उल्लंघन...नेवरीतील दोघांवर गुन्हा दाखल 

संतोष कणसे 
Sunday, 19 July 2020

कडेगाव (सांगली) - कंटेन्मेंट झोनचे उल्लंघन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकारणी नेवरी (ता. कडेगाव) येथील शुभांगी अनिल शिंदे (वय- 30) व अनिल शामराव शिंदे (वय-34 दोघे रा.नेवरी) यांच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबत येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका एस. ए. इंगळे यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सर्वत्र दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. तर तालुक्‍यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ही वाढ रोखण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनास संशयित रुग्ण परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहे. तर नेवरी येथे बाहेरगावहुन आलेल्या एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याने विठ्ठलनगर नेवरी मळा हा परिसर प्रशासनाने कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.

दरम्यान शुभांगी शिंदे व अनिल शिंदे हे कोरोनाबधित रुग्णांच्या संपर्कात असल्याने त्यांच्या स्वाईबचा अहवाल घेण्यात आला होता. मात्र त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याना घरातच विलगिकरणात ठेवण्यात आले होते.तर अशा परिस्थितीत शनिवार (ता.18) रोजी शुभांगी व अनिल शिंदे हे दोघे कंटेन्मेंट झोन मध्ये असूनही ते प्रशासनासह कोणालाही न सांगता तेथून इतर ठिकाणी निघून गेले असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला.या घटनेची कडेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

संपादन : घनशाम नवाथे 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violation of containment zone . Crime filed against two in Newari