यात्रा बंदी आदेशाचा भंग; सुरूल येथील 70 लोकांवर इस्लामपूर ठाण्यात गुन्हा

Violation of festival ban order; Crime against 70 people in Surul in Islampur police station
Violation of festival ban order; Crime against 70 people in Surul in Islampur police station
Updated on

इस्लामपूर (जि. सांगली) ः कोरोना पार्श्‍वभूमीवर यात्रा बंदीसंदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सुरुल (ता. वाळवा) येथील सुमारे सत्तर लोकांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत हवालदार सूर्यकांत शिवाजी निकम यांनी फिर्याद दिली आहे. 

या प्रकरणी सर्जेराव शंकर पाटील, महेश कैलास वायदंडे, निवृत्ती जगन्नाथ मदने, अशोक रंगराव पाटील, भगवान रघुनाथ पाटील, विक्रम सर्जेराव पाटील, दत्तात्रय मारुती पाटील, संग्राम विजय गायकवाड, माणिक परसू पाटील, शिवाजी परसू पाटील, पोपट रघुनाथ पाटील, शंकर कोळेकर, अभिजीत सर्जेराव पाटील, महादेव तुकाराम बंडगर, किरण वसंत पाटील, संजय मारुती पाटील, नवनीत नानासो पाटील, जयवंत मारुती पाटील, सुशिल माणिक पाटील, बरमा बाळासो पाटील (सर्व रा. सुरुल) यांच्यासह अनोळखी 40 ते 50 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

फिर्यादीत म्हटले आहे की, "हवालदार निकम यांच्यासह पोलिस कर्मचारी जी. बी. माळी, के. डी. शेणेकर यांचे राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलिंगसाठी तैनात होते. सुरुल गावची यात्रा असल्याने पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी या पथकाला सुरुल येथे बंदोबस्तासाठी जाण्याचे तोंडी आदेश दिले.

या पथकासह इस्लामपूर पोलिस ठाण्यातील हवालदार भोसले व पाटील, सुरुलचे पोलिसपाटील एम. वाय. पाटील सुरुल येथे गेले. शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास सुरुल ग्रामपंचायतीकडून सुमारे साठ ते सत्तर लोक देवाचा रथ दोऱ्या लाऊन ओढत मंदिराच्या दिशेने येत असल्याचे या पथकाला दिसले.

पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. गर्दी जमवून रथ यात्रा काढता येणार नाही असे सांगितले. संबंधित लोकांनी काहीही न ऐकता यात्रासंबंधी बंदी आदेशाचा भंग करीत रथ माणकेश्‍वर मंदिराजवळ आणून लावला. पोलिसांनी पोलिसपाटील एम. वाय. पाटील यांच्याकडून जमावातील लोकांची नावे माहिती करुन घेतली ववीस लोकांसह यात्रा कमिटीतील लोक व अन्य अनोळखी अशा 60 ते 70 लोकांवर गुन्हा नोंदवला.

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com