वाल्मिकी घरकुलात भरदिवसा महिलेचा घरात घुसून विनयभंग...गुंडांकडून बलात्कार व खुनाची धमकी 

घनश्‍याम नवाथे
Thursday, 3 September 2020

सांगली- शहरातील गुन्हेगारीचे आश्रयस्थान बनलेल्या जुना बुधगाव रस्त्यावरील वाल्मिकी-आंबेडकर घरकुलात चाकू आणि सत्तूरचा धाक दाखवून सामाजिक कार्यकर्त्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार भरदिवसा घडला. बेकायदेशीर दारूचा व्यवसाय बंद पाडल्याच्या कारणातून विनयभंग करून बलात्कार करण्याची व खुनाची धमकी दिल्याबद्दल पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी सातजणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

सांगली- शहरातील गुन्हेगारीचे आश्रयस्थान बनलेल्या जुना बुधगाव रस्त्यावरील वाल्मिकी-आंबेडकर घरकुलात चाकू आणि सत्तूरचा धाक दाखवून सामाजिक कार्यकर्त्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार भरदिवसा घडला. बेकायदेशीर दारूचा व्यवसाय बंद पाडल्याच्या कारणातून विनयभंग करून बलात्कार करण्याची व खुनाची धमकी दिल्याबद्दल पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी सातजणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

संशयित वन्या ऊर्फ बबलू चौगुले (वय 25), मॅडी ऊर्फ महेश नारायणकर (वय 22), शालन चौगुले (वय 45), पिंकी चौगुले (वय 22), मोहन नारायणकर (वय 55), कुसूम महेश नारायणकर (वय 21) आणि अनोळखी महिला व पुरूष (सर्व रा. वाल्मिकी आवास) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी 30 वर्षीय महिला ही वाल्मिकी आवास घरकुलात राहते. ती एका दलित संघटनेची अध्यक्ष असून सामाजिक कार्यकर्ती आहे. संशयित परिसरात बेकायदेशीरपणे दारूचा अड्डा चालवतात. काही दिवसापूर्वी पोलिसांनी कारवाई दारूअड्डा बंद पाडला होता. याप्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या महिलेने फिर्याद दिल्याचा संशय संबंधितांना होता. त्याच रागातून आठजणांनी सकाळी दहाच्या सुमारास महिला घरात एकटीच असल्याचे पाहून घुसखोरी केली. 

वन्या चौगुले याने महिलेचा विनयभंग करून आताच बलात्कार करतो असे धमकावून अश्‍लिल शिवीगाळ केली. तसेच महिलेच्या पोटाला सत्तूर लावून पोटाची आतडी बाहेर काढतो अशी धमकी दिली. शालन चौगुले हीने हातातील चाकू महिलेच्या गळ्याला लावून पिंकी चौगुले व कुसूम नारायणकर यांना दारूचे नुकसान केल्याचे सांगत गळ्यातील मंगळसुत्र काढून घ्या असे सांगितले. तेव्हा दोघींनी महिलेचे केस धरून गळ्यात मंगळसुत्र हिसडा मारून तोडले. त्यानंतर सर्वांनी महिलेस लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून ठार करून तुकडे-तुकडे करतो अशी धमकी दिली. त्यानंतर सर्वजण निघून गेले. दरम्यान घाबरलेल्या महिलेने सांगली शहर पोलिस ठाणे गाठून आठजणांविरूद्ध फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित पसार आहेत. 

गुन्हेगारी फोफावली- 
वाल्मिकी आवास घरकुल परिसरात लॉकडाउन काळात अवैध व्यवसाय जोमाने वाढलेत. पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे पाहून दारू, मटका, लुटमारीचे प्रकार वाढलेत. नागरिकांमध्ये कोरोनापेक्षा इथल्या गुंडगिरीचे अधिक भय आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violence against women in Valmiki household. Rape and death threats by criminals