esakal | झालं आता आला तोही उखाणा (व्हिडिओ) 
sakal

बोलून बातमी शोधा

The Viral of pubg game ukhana

लग्न समारंभ, घरगुती कार्यक्रमावेळी महिला नाव घेण्यासाठी उखाणा घेतात. सगळ्यात चांगला उखाणा व्हावा म्हणून महिला व मुली तर पुस्तके घेऊन उखाणे पाठ करतात. सध्या गुगलवर अनेक प्रकारचे उखाणे आहेत, त्यामुळे त्यावरही सर्च केले जातात. लग्नजवळ आल्यानंतर आपण उखाणा काय घ्यायचा याची तयारी आधीपासूनच मुलं- मुली करतात.

झालं आता आला तोही उखाणा (व्हिडिओ) 

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

सोलापूर : स्मार्ट फोनमध्ये खेळल्या जाणाऱ्या पबजी गेमने अनेकांना भुरळ घातली आहे. या गेममुळे काहींच्या मनावर परिणाम झाल्याची उदारहणे आपण पाहिली आहेत. त्यातच आता या गेमचा उखाणा व्हायरल झाला आहे. 
लग्न समारंभ, घरगुती कार्यक्रमावेळी महिला नाव घेण्यासाठी उखाणा घेतात. सगळ्यात चांगला उखाणा व्हावा म्हणून महिला व मुली तर पुस्तके घेऊन उखाणे पाठ करतात. सध्या गुगलवर अनेक प्रकारचे उखाणे आहेत, त्यामुळे त्यावरही सर्च केले जातात. लग्नजवळ आल्यानंतर आपण उखाणा काय घ्यायचा याची तयारी आधीपासूनच मुलं- मुली करतात. यात सध्या मुलं सुद्धा मागे नाहीत. ते सुद्धा हाटके उखाणे घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतात. राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर काही नवरदेवांनी तर राजकीय उखाणे घेतले होते. एका राष्ट्रवादीप्रेमीनी मी राष्ट्रवादी मी राष्ट्रवादी... असं म्हणत उखाणाला घेतला होता. त्यानंतर काही दिवसातच भाजपप्रेमी नवरदेवाने मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन... असे यमक जुळवून उखाणा घेतला होता. ते उखाणे अजुन चर्चेत आहेत. त्यातच आता पबजीचा उखाणा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

गेल्या आठवड्यात मकरसंक्रात झाली. त्यावेळी अनेक महिला हळदीकुंकाच्या कार्यक्रमासाठी एकत्र येत आल्या. दरम्यान एकमेकींना वाण देत महिला उखाणे घेत होते. त्यातही वेगवेगळे उखाणे पहायला मिळाले. सध्या व्हायरल झालेल्या उखाण्यामध्ये एका गृहिणने पबजीवर उखाणा घेतला आहे. टीकटॉकवर तो शेअर केला असून त्याला प्रतिसादही खूप चांगला मिळाला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, 
"मराठीत बोलतात भाजी.., 
हिंदी बोलतात सबजी.., 
रणजितरावांचे नाव घेते.. 
जय पबजी..'