विक्रमी विजयानंतर विश्वजित कदमांचा राहुल गांधींसोबत फोटो व्हायरल

संतोष कणसे
Sunday, 27 October 2019

वास्तविक प्रियांका गांधी यांच्या या एकाच वाक्याने काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या राज्यातील नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले असावे. राज्यात काँग्रेसची सत्ता आली नसली तरी या निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मात्र मिळाले आहे.

कडेगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये प्रवेशासाठी दिलेली ऑफर नाकारून  'काँग्रेसचा वाघ' विश्वजित कदम यांनी १ लाख ६२ हजार इतके महाराष्ट्राच्या इतिहासातील विक्रमी मताधिक्य घेतले. खूप खुप शुभेच्छा अशी पोस्ट प्रियांका गांधी यांनी त्यांच्या फेसबुक पेजद्वारे केली आहे. तसेच विश्वजित कदम यांचा राहुल गांधी यांच्यासमवेतचा फोटोही शेअर केला आहे. ही पोस्ट विश्वजित कदम यांचे कौतुक करणारी तर आहेच पण विद्यमान राजकारणावर नेमके भाष्य करणारी आहे. 

वास्तविक प्रियांका गांधी यांच्या या एकाच वाक्याने काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या राज्यातील नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले असावे. राज्यात काँग्रेसची सत्ता आली नसली तरी या निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मात्र मिळाले आहे.

विश्वजित कदम यांच्यात राज्याच्या नेतृत्वाची क्षमता आहे. त्यांच्या कामगिरीची दखल दिल्ली दरबारी घेतली जाते. यासह आता आगामी काळातील राजकारण कसे असेल याची चुणूक यानिमित्ताने पाहायला मिळाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishwajeet Kadam meets Congress MP Rahul Gandhi in Delhi