
विटा : येथे बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन झालेल्या १ लाख ३४ हजार रुपये किमतीच्या मोबाईल व सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. चमेली दौलुशा पवार ( वय ३८, सोमेश्वरनगर, आटपाडी) व प्रिया रवींद्र काळे (वय ३०, हजापूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) अशी संशयित चोरट्या महिलेची नावे आहेत. त्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातील १ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले.