
विटा : एसटीची दोन्ही चाके एका वृद्ध महिलेच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन ती जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास रेवणगाव (ता. खानापूर) घाटात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. राधाबाई श्रीरंग शिंदे (वय ८६, कुर्ली, ता. खानापूर) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे.