esakal | विटा पालिकेचा 125 कोटींचा अर्थसंकल्प सादर

बोलून बातमी शोधा

Vita Palika's budget of Rs 125 crore presented}

विटा नगर परिषदेचा सन 2021-2022 वर्षाचा 125 कोटी 50 लाख 38 हजार 944 रुपयांचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्षा सौ.सारिका सपकाळ यांनी  केला. 

विटा पालिकेचा 125 कोटींचा अर्थसंकल्प सादर
sakal_logo
By
गजानन बाबर

विटा : विटा नगर परिषदेचा सन 2021-2022 वर्षाचा 125 कोटी 50 लाख 38 हजार 944 रुपयांचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्षा सौ.सारिका सपकाळ यांनी  केला. 

मुख्याधिकारी अतुल पाटील, प्रतोद ऍड. वैभव पाटील, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. अर्थसंकल्पात घरपट्टी, पाणीपट्टीची करवाढ करण्यात आली नाही. पालिकेस घरपट्टी कर - 5 कोटी, पाणीपट्टी कर - साडेचार कोटी, मालमत्ता व फी पासून - 2 कोटी 47 लाख, महसुली व भांडवली अनुदान - 62 कोटी 75 लाख असे 86 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. खर्चाच्या बाजूत नवीन रस्ते व रस्ते दुरुस्ती - सव्वापाच कोटी, भुयारी गटार - 6 कोटी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाणी योजना - साडेसात कोटी, अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना - 5 कोटी, पंतप्रधान आवास - 7 कोटी , वैशिष्ट्यपूर्ण योजना - 5 कोटी , स्वच्छ महाराष्ट्र - दीड कोटी , नागरी दलितेतर योजना - 75 लाख. 

14 वा वित्त आयोग - 8 कोटी , 15 वा वित्त आयोग - साडेसात कोटी, घनकचरा व्यवस्थापन - 1 कोटी , रमाई आवास योजना घरकुल - 50 लाख , मागासवर्गीय सुधारणा पाणी योजना - 20 लाख , विशेष रस्ता अनुदान - 4 कोटी, वैशिष्ट्यपूर्ण ठोक अनुदान - 2 कोटी , नाविन्यपूर्ण - 1 कोटी , जिल्हा वार्षिक योजना - 3 कोटी , गटार बांधकाम व दुरुस्ती - 1 कोटी 20 लाख , हरित पट्टे विकास - 40 लाख , माझी वसुंधरा अभियान - 35 लाख , नाट्यगृह - 25 लाख , व्यायामशाळा विकास - 20 लाख, मॉडेल (डिजिटल) स्कूल व गुंफा - मूळ स्थान विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यास "ई रिक्षा' वाहतूक ही तरतूद गृहीत धरली आहे. 2 लाख 90 हजाराचे शिलकी अंदाजपत्रक आहे. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार