Sangli Crime : विट्यात सव्वातीन लाखांचे मोबाईल जप्त; मोबाईल मूळ मालकांना केले परत
Vita Police Recover Mobiles Valued at ₹3.25 Lakh : तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने गहाळ झालेल्या मोबाईलबाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून राज्यातील विविध जिल्ह्यांतून तीन लाख २५ हजार रुपयांचे २५ मोबाईल शोधून काढले. ते मूळ मालकांना परत केले.
Vita police handing over recovered mobile phones worth ₹3.25 lakh to their rightful owners in an official event.Sakal
विटा : विटा पोलिस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे गहाळ झालेल्या ३ लाख २५ हजार रुपये किमतीच्या मोबाईलचा शोध घेऊन ते जप्त केले. हे मोबाईल मूळ मालकांना परत केल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले.