इचलकरंजी - राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाच्या पदाधिकारी निवडीचा वाद मिटला आहे. पक्षाच्या प्रदेश चिटणीस पदाची जबाबदारी विठ्ठल चोपडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या पक्षाच्या इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष पदावर सुहास जांभळे यांना संधी देण्यात आली आहे.