Vidhan Sabha 2019 : ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी विक्रमी मताधिक्याने विजयी करा : हर्षवर्धन 

 Vote to Witness the Historical Moment said Harshvardhan Patil
Vote to Witness the Historical Moment said Harshvardhan Patil

Vidhan Sabha 2019 :  इंदापूर : इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजसत्तेची गरज असून आपण केंद्र व राज्य - सरकारच्या जवळ आहे. प्रशासनात कामकरण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तालुका राज्यात आदर्श बनवण्यासाठी तसेच भाजप प्रणीत महायुतीचा पहिला आमदार विजयी करण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले.
 
महायुतीच्या 22 कलमी संकल्पनाम्याचे प्रकाशन महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, भाजप तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, शिवसेना तालुका प्रमुख नितीन शिंदे, रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे, रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष निलेश देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लालासाहेब पवार, भरत शहा, मंगेश पाटील, रघुनाथ राऊत, अॅड मनोहर चौधरी , तुकाराम जाधव, अशोक घोगरे, दादासाहेब पिसे, अविनाश कोतमिरे, शकिलभाई सय्यद अशोक इजगुडे, राहुल जाधव, अमोल राजगुरू, सिकंदर बागवान उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, ''शेतीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यास सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी खडकवासला, भाटघर, उजनी, मुळशी तालुक्यातील टाटा प्रकल्पाच्या पाण्याचे नियोजन प्राधान्याने करण्यात येईल. निरा डावा, खडकवासला कालवा विस्तारीकरण, निरा व भीमा नदीवर बुडीत बंधारे निर्माती, कृष्णा- निरा-भीमा नदी स्थिरीकरण प्रकल्पातून 5 टीएमसी पाण्याचे नियोजन केले जाईल. उपलब्ध पाण्यात मत्स्यव्यवसायास चालना दिली जाईल. उजनी जलपर्यटन, कृषी व विधी महाविद्यालय सुरू करणे, लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग आणून बेरोजगारी दूर केले जाईल. द्राक्ष, केळी, डाळिंब व पालेभाजी प्रकिया उद्योग व शीतगृह उभारणी केली जाईल. तीर्थक्षेत्र पर्यटन वाढीस प्राधान्य दिले जाईल. शेती महामंडळ कामगारांना हक्काची घरे मिळवून दिले जातील. युवक, युवती व महिलांचे कौशल्यावर आधारित उद्योग उभारणी करून सक्षमीकरण केले जाईल. पाटस ते पंढरपूर पालखी मार्ग भूसंपादन मोबदला प्रकिया पारदर्शी पद्धतीने केली जाईल. सुसज्ज ट्रॉमा सेन्टर व हॉस्पिटल सुरु केले जाईल. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या विकासाचा अनुशेष भरला जाईल मात्र त्यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून मला विजयी करा.'' सुत्रसंचलन प्रचारप्रमुख अॅड. कृष्णाजी यादव यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com