
मात्र काही गावांमध्ये मतदारांना चक्क विमानातून आणले जात आहे.
विसापूर (सांगली) : निवडणूक म्हणजे टोकाचा संघर्ष, प्रचंड ईर्षा. प्रत्यक्ष मतदाराचे मत मिळविण्यासाठी उमेदवार जोरदार प्रयत्न करत असतो. आणि ग्रामपंचायत निवडणूक असेल तर मग ती ईर्षा सत्यात उतरते. एका मतांवर सुद्धा बाजी पलटते. एका मताने अख्ख पॅनेल पडू शकते. त्यामुळे मत मिळविण्यासाठी उमेदवार वाटेल ते प्रयत्न करतात. मतदाराची हौसमौज पुरवली जाते. एक मत घेण्यासाठी दुचाकी, चारचाकी गाड्या तैनात केलेल्या असतात.
मात्र काही गावांमध्ये मतदारांना चक्क विमानातून आणले जात आहे. तसेच त्यांच्यासाठी रेल्वेचे आरक्षणही करून ठेवण्यात आले आहे. येथून जवळच असलेल्या धामणी, पाडळी, हातनोली या गावांमधील अनेक ग्रामस्थ गलाई व्यवसायासाठी संबंध देशात विखुरलेले आहेत. मात्र यातील अनेक कुटुंबातील सदस्यांची नावे अद्यापही गावाकडील मतदार यादीत आहेत. त्यामुळे त्यांची मते ग्रामपंचायतीला उपयोगी पडतात. मात्र प्रवास खर्च व लागणारा वेळ पाहता मतदानासाठी यायलाच नको अशी म्हणण्याची वेळ या सर्वांवर येते. अगोदरच लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे आर्थिक टंचाईच्या झळा बसत आहेत. तेव्हा निवडणूकच नको अशी मानसिकता गलाई व्यावसायिकांची झाली आहे.
हेही वाचा - नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता
मात्र या मतांची किती गरज असते हे निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारालाच माहीत. त्यामुळे ही मते आलीच पाहिजेत यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. म्हणून जवळचे आहेत. एक दोन दिवसाच्या अंतरावर आहेत. त्यांच्यासाठी रेल्वेचे आरक्षण करण्यात आले आहे. फार दूर अंतरावर आहे त्यांना थेट विमानाचे तिकीट दिले आहे. त्यामुळे मतदार थेट विमान आणि रेल्वेने प्रवास करणार आहेत. यासाठी उमेदवारांनी मतदारांची यादी आरक्षण हे सर्व पूर्ण केले आहे. त्यामुळे ही मते मिळणारच अशी त्यांची मानसिकता आहे. काय का असेना पण मतदार विमानातून प्रवास करतो हेच त्यांच्यासाठी वैशिष्ट्य आहे.
संपादन - स्नेहल कदम