वाकुर्डे पूर्ण होईल अन् विरोधकांचे तुणतुणे बंद; मानसिंगराव नाईक

मानसिंगराव नाईक; योजनेचे श्रेय जयंत पाटील यांचे
मानसिंगराव नाईक; योजनेचे श्रेय जयंत पाटील
मानसिंगराव नाईक; योजनेचे श्रेय जयंत पाटील sakal

शिराळा : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून सन २०२४ पर्यंत वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेचे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे विरोधकांचे वाकुर्डे योजनेचे तुणतुणे वाजणे बंद होईल. या योजनेचे खरे श्रेय जयंत पाटील यांचे आहे. ते कोणी लाटण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला आमदार मानसिंगराव नाईक यांनी माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचे नाव न घेता लगावला.

नागमनी विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,‘‘सन २००९ मध्ये आमदार असताना योजनेला तत्कालीन मंत्री अजित पवार यांनी १६५ कोटींचा निधी दिला. अंशतः वाकुर्डे योजना कार्यन्वित झाली. युतीने पाच वर्षांत फक्त ६० कोटींचा तुटपुंजा निधी दिला. सन २०१९ ला महाविकास आघाडी सरकार आले.

मानसिंगराव नाईक; योजनेचे श्रेय जयंत पाटील
सांगली : सर्वसामान्यांना महागाईचे चटके

जयंत पाटील जलसंपदामंत्री झाल्यानंतर वाकुर्डे योजनेची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी मागणी केल्या प्रमाणे दोन वर्षांत वाकुर्डेसाठी २०० व वारणा डावा कालव्यासाठी २०० कोटी असा तालुक्याला ४०० कोटींचा निधी दिला. युतीच्या काळात रेंगाळलेल्या योजनेला गती मिळाली आहे. आता या योजनेला ९०८.४४ कोटींची सुधारित मान्यता मिळाल्याने या योजनेच्या कामांना आणखी गती मिळेल.’’

ते म्हणाले,‘‘शिराळा तालुक्यातील मेणी, शिरशी व इतर प्रस्तावित कामांच्या निविदा डिसेंबरअखेर निघून ती ही कामे सुरू होती. या योजनेला सुधारित मान्यता मिळाल्याने नाबार्डचे अर्थसहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तालुक्यातील सर्व कामांची टेंडर निघाल्यानंतर वाळवे तालुक्यातील कामांची टेंडर निघतील. नाही तर शिराळाऐवजी वाळव्याच्या कामांची टेंडर निघणार अशी कोणीतरी अफवा पसरवून लोकांत संभ्रम निर्माण करेल. ही योजना जयंत पाटील यांच्यामुळेच पूर्णत्वास जाणार असल्याने श्रेय त्यांचेच आहे.’’

युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे. सहाय्यक अभियंता डी. डी. परळे, शाखा अभियंता व्ही. एम. पाटील, ‘विश्वास’ चे माजी संचालक भीमराव पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com