
-अतुल पाटील
सांगली : अभियांत्रिकीचं शिक्षण घ्यायचं तर ‘वालचंद’मध्येच, असं अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मापदंड म्हणजे वालचंद. ही ओळख तपस्येतून मिळाली आहे. त्यातीलच एक घटक म्हणजे ‘प्लेसमेंट’. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला नोकरी मिळतेच मिळते. गेल्या तीन वर्षांची आकडेवारी पाहिली तर, सरासरी ९० टक्के विद्यार्थ्यांना सरासरी नऊ लाख रुपयांहून अधिक वार्षिक वेतन मिळत आहे. काही विद्यार्थ्यांचा उच्चशिक्षणाकडे कल वाढत आहे.