
लगेच प्रयोग सुरू करायचे आहेत. महापालिकेच्या वर्धापनदिनानिमीत्तचे सांस्कृतिक कार्यक्रम बालगंधर्वमध्ये होणार आहेत. त्यामुळे हे नाट्यगृह पुर्ण मोकळे करा, असे आदेश महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेच्या घरपट्टी, विद्युत आणि सामान्य प्रशासनास दिले.
मिरज : लगेच प्रयोग सुरू करायचे आहेत. महापालिकेच्या वर्धापनदिनानिमीत्तचे सांस्कृतिक कार्यक्रम बालगंधर्वमध्ये होणार आहेत. त्यामुळे हे नाट्यगृह पुर्ण मोकळे करा, असे आदेश महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेच्या घरपट्टी, विद्युत आणि सामान्य प्रशासनास दिले. येथील आधार कार्डाच्या ठेकेदारासही येथुन जाण्यास सांगितले. नाट्यगृहाची दुरूस्ती आणि सुविंधांबाबतही त्यांनी ठेकेदार, आधिकारी, आणि रंगकर्मींशी चर्चा केली.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज अचानकपणे येथील बालगंधर्व नाट्यगृाहस भेट देऊन येथील नुतनीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नाट्यगृहात महापालिकेच्याच विद्युत आणि घरपट्टी विभागाने केलेल्या अतिक्रमणाबाबत चौकशी केली. आयुक्त येताच विद्युत विभागाचे साहित्य हलवण्यास सुरवात झालेली दिसताच सबंधित आधिकाऱ्यांची चांगलीच कानऊघडणी केली.
घरपट्टी विभागाची कागदपत्रे ठेवण्यासाठी पर्यायी जागा शोधा आणि त्यांना तातडीने ही कागदपत्रे हलविण्यास सांगितले. तळघरातील कलादालन आणि नाटकांच्या तालमींसाठी नाट्यगृहाचा परिसर नाट्यसंस्थाना देण्याबाबतही त्यांनी ही दोन्ही कामे लगेच होतील असे आश्वासन दिले. नाट्यगृहातील ध्वनी आणि प्रकाशयोजनेच्या कामाची तरतुद यापुर्वीच्या दुरूस्ती ठेक्यात करण्यात आली असल्याने सबंधित कामेही त्यामधील तरतुदीनुसार अद्ययावत यंत्रणेनुसार करण्याचे आश्वासन त्यांनी रंगकर्मींना दिले.
नुसत्या फायली नाचवु नका...
नाट्यगृहातील कामाबाबत आधिकाऱ्यांची कानउघडणी करताना काम टाळण्यासाठी माझ्यापुढे सतत फायली आणायच्या नाहीत. नुसत्या फायली तयार करुन कामे प्रलबिंत ठेवण्याची मानसिकता बदला अशी समजही आयुक्त कापडणीस यांनी यावेळी महापालिका आधिकाना दिली.
दर तासाला फोन...
आदेश देऊनही बालगंधर्व मोकळे होत नसेल तर जबाबदार आधिकाऱ्यास प्रत्येक तासाला फोन करुन त्याचे अपडेट घ्या आणि मलाही नेमके काय झाले हे सांगा. याबाबत विद्युत आणि घरपट्टी विभागासह आधार कार्डचा ठेकेदार टाळाटाळ करत असेल तर तसेही सांगा असे आदेश त्यांनी स्विय सहाय्यकांना देताच सगळेजण तातडीने कामास लागले.
संपादन : प्रफुल्ल सुतार