Warana River water discharge news
esakal
वारणावती : वारणा (चांदोली) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे परिचलन सूचीनुसार धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी (Warana Dam water release today) काल सायंकाळी ५.३० वाजता वक्राकार दरवाजातून वारणा नदीपात्रात ५५०० व जलविद्युत प्रकल्पातून १४०० असा एकूण ६९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.