वारणेचे पाणी पात्राबाहेर...दोन दिवसापासून दमदार पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

मांगले (सांगली)- चांदोली धरणातून वाढवलेला पाण्याचा विसर्ग आणि वारणा काठावर गेल्या दोन दिवसापासून सरू आलेल्या पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होवू लागली आहे. बुधवारी सकाळपासून देखील परिसरात धुवाधार पाउस पडत आहे. त्यामुळे परिसरातील ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. 

शिराळा तालुक्‍यातील माळरानातील भुईमुग, सोयाबीनसह भात पिकाला मोठ्या पावसाची गरज होती. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून मोठ्या पावसाकडे शेतक-यांचे डोळे लागले होते. आज सकाळपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यात पावसाने ओढ दिली होती. पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतक-यांनी पिकांची आंतर मशागतीची कामे, खुरपणी करून घेतली आहे. त्यानंतर पावसाची प्रतिक्षा सुरू होती. दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सध्याच्या पाऊस पिकांना पोषक ठरणार आहे. 
आज सकाळपासून जोरदार पडणारा पाऊस तसेच चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीची पाण्याची पातळी वाढत आहे. पाणी पात्राबाहेर पडले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warna river water out of container, Heavy rain for two days Heavy rain for two days

Tags
टॉपिकस
Topic Tags: