तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी युवकांचा आमरण उपोषणाचा इशारा

 संजय बागडे 
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

- तिसंगी-सोनके परिसरात भयान दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

-  गेल्या दोन  वर्षापासुन भाटघर देवधर पूर्ण क्षमतेने भरून सुद्धा तिसंगी-सोनके तलावात पाणी सोडले नाही.

- दोन दिवसात पाणी सोडले नाहीतर अमरण उपोषण सोमवार (ता २६ ) तिसंगी येथे तलावात पाणी सोडण्याचे ठिकाणा इनलेट नाला येथे करणार आहे असा इशारा युवा शेतकऱ्यांनी केला आहे.

तिसंगी : तिसंगी- सोनके (ता.पंढरपूर) तलावात पाणी सोडाण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र निरा उजवा कालवा उपविभाग पंढरपूर याना दिले आहे. तिसंगी-सोनके तलाव (क्षमता ९२४ एम् सी एफ टी) होण्याच्या अगोदर १९२९ पासून तिसंगी-सोनके परिसरातील आकरा गावांना नीरा उजवा कालवा वितरिका क्रमांक डी तीन वरून पाणी दिले जात होते. परंतु  १९५९ मध्ये तिसंगी-सोनके तलावाचे काम मंजूर होवून ते १९६५ पासून आजतागायत पर्यंत तलावातुन  कार्यक्षेत्र पाणी चालू आहे. गेल्या दोन  वर्षापासुन भाटघर देवधर पूर्ण क्षमतेने भरून सुद्धा तिसंगी-सोनके तलावात पाणी सोडले नाही.

उन्हाळ्याची तीव्रता आणि पावसाने पाठ फिरवल्यामुळे तिसंगी-सोनके परिसरात भयान दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तलाव परिसर क्षेत्रांमध्ये पाऊस झाला नाही. पण भाटघर आणि देवधर धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली. लाखो टीएमसी पाणी नीरा नदीतुन वाहून गेले. नियोजना अभावी तलावात पाणी सोडले नाही. गेली दोन वर्ष अशी परिस्थिती असताना सुद्धा तलावात पाणी सोडले नाही. फक्त अधिकारी पदाअधिकारी पाणी सोडतो अशी खोटी आश्वासने शेतकऱ्यांना देत आहेत. अश्वासने नको पाणी सोडा या मागणीसाठी नवनाथ भिकाजी कोळेकर, संतोष पाटील, तानाजी गोफने, पांडुरंग हाके हे युवक (सोनके ता.पंढरपूर) दोन दिवसात पाणी सोडले नाहीतर अमरण उपोषण सोमवार (ता २६ ) तिसंगी येथे तलावात पाणी सोडण्याचे ठिकाणा इनलेट नाला येथे करणार आहे.

तलावात पाणी सोडण्यासाठी आमदार गणपतराव देशमुख, आमदार परिचारक, आमदार भालके, आमदार सावंत यानी परिसरातील शेतकऱ्यांना न्याय द्याव, जबाबदार अधिकाऱ्यांना धारेवर धरून तलावात पाणी सोडावे.

"वास्तविक ही गोष्टी व्हायला नको होती. कारण भीमा आणि नीरा भाटघर धरणातून बरेच पाणी पुराच्या माध्यमातून वाहुन गेले ते पाणी नियोजनकरून कालव्यातून तलावात सोडले असते. ही वेळ शेतकऱ्यांना च्या पोरावर आली नसती."
संतोष पाटील
उपोषण कर्ता युवक शेतकरी सोनके

"गेली दोन वर्ष झाले तिसंगी- सोनके परिसरात पाऊस नाही. हजारो टन ऊस उत्पादन करणारी गावे आज मितीस चार्यासाठी पण ऊस शिल्लक नाही. आम्हा युवक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तलावात पाणी सोडा अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या"
तानाजी गोफणे 
उपोषण कर्ता युवा शेतकरी सोनके.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning form youths to fast on demand for release of water in pond