जातेगाव येथील पाणी पुरवठा व पाझर तलावाने गाठले तळ 

सचिन गायकवाड 
मंगळवार, 19 जून 2018

जातेगाव -  नांदगांव तालुक्यातील जातेग़ाव येथील ग्रामपालीकेच्या येथील पाझर तलावालगत सार्वजनिक पाणीपुरवठा करणेसाठी दोन विहीरी असुन, या दोनही विहीरीसह पाझर तलावाने तळ गाठल्याने गेल्या काही दिवसांपासून येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. या विहीरीहुन गावांसाठी व वसंतनगर क्र1. तांड्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. परंतु गेल्या काही दिवसांपासून कधी नाही ती उष्णतेत वाढ झाल्याने पाझर तलावातील आटले. त्यामुळे परिसरातील विहीरींचे पाणी आटले आहे. जुन महिना संपत आला तरी जातेग़ावसह परिसरात अध्याप पाऊस पडण्यास सुरुवात झाली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

जातेगाव -  नांदगांव तालुक्यातील जातेग़ाव येथील ग्रामपालीकेच्या येथील पाझर तलावालगत सार्वजनिक पाणीपुरवठा करणेसाठी दोन विहीरी असुन, या दोनही विहीरीसह पाझर तलावाने तळ गाठल्याने गेल्या काही दिवसांपासून येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. या विहीरीहुन गावांसाठी व वसंतनगर क्र1. तांड्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. परंतु गेल्या काही दिवसांपासून कधी नाही ती उष्णतेत वाढ झाल्याने पाझर तलावातील आटले. त्यामुळे परिसरातील विहीरींचे पाणी आटले आहे. जुन महिना संपत आला तरी जातेग़ावसह परिसरात अध्याप पाऊस पडण्यास सुरुवात झाली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपालीकेने वेगळीच उपाय योजना केली असती तर ही वेळ आली नसती. परिणामी अबालवृध्दांना व महिलांसह परीसरातील शेतातील विहीरीतून पाणी आनण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

येथील ग्रामपालीकेने पाणी पुरवठा करण्यासाठी कारभारी महादु पवार यांच्या गट नंबर 18, शिवराम वामन पवार यांच्या गट नंबर 21व बद्रिनाथ महादु चव्हाण यांच्या गट नंबर 26/12 या शेतातील तीन विहीरी दि. 23मे रोजी अधिग्रहित केल्या होत्या. त्यापैकी एका विहीरीने तळ गाठल्याने व कारभारी पवार यांनी विहिरी अधिग्रहित करण्यास विरोध दर्शविल्याने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना कळविले असल्याचे सरपंच जयश्री लाठे यांनी सांगितले. नवीन विहीर अधिग्रहण करुण पाईप लाईन करेपर्यंत नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच लाठे यांनी केले आहे. जातेग़ावसह वसंतनगर येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे खाजगी टँकरने पाणीपुरवठा करणार्यांना सुगीचे दिवस आले असुन, दोनशे लीटर पाण्यासाठी नागरिकांना 40रुपये मोजावे लागत आहे. तर गोरगरीब नागरीकांना व महिलांसह अबालवृध्दांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथील पाझरतलावापासुन, काही अंतरावर लक्ष्मण ढगे यांच्या शेतातील विहीर असुन, सदरची विहीर अधिग्रहित केल्यास पाणी पुरवठा होऊ शकतो. वसंत नगरक्र.2 (भिमाचा तांडा) येथील असलेल्या दोन पैकी एक हॅन्डपंप पाण्याअभावी बंद पडला असुन दुसराही बंद पडण्याच्या परीस्थीतीत आहे. तेथे टँकरने पाणीपुरवठा सुरू करणे जरुरीचे आहे. यासाठी ग्रामविकास अधिकारी आणी गट विकास अधिकारी यांनी तातडीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: water crisis in jategaon