
इस्लामपूर : वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पाण्यावरून रेठरे धरण (ता. वाळवा) येथे स्थानिक दोन राजकीय गटांत मारामारी झाली. यात दोन्ही बाजूंकडील चौघे जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूंकडून पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी देण्यात आल्या आहेत. सरपंच हर्षवर्धन आनंदराव पाटील, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल गुणवंत पाटील यांच्यासह १९ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.