...आणि सांगलीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

नदीचे पाणी पत्राबाहेर आल्याने शिवारात आणि गावात काही प्रमाणात पाणी शिरले.

नवेखेड : वाळवा तालुक्यात कृष्णा नदीचे पाणी काल दुपारपर्यंत नदी पात्रात गेले. त्यामुळे महापूराची धास्ती घेतलेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला. चार दिवसांपूर्वी पाणलोट क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस, कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे तालुक्यात कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती.

नदीचे पाणी पत्राबाहेर आल्याने शिवारात आणि गावात काही प्रमाणात पाणी शिरले. बोरगाव, बहे, नागठाणे ही बंधारे पाण्याखाली गेले. तालुक्यातील बहे, शिरठे, बोरगाव, रेठरे, हरणाक्ष ,बनेवाडी साठपेवाडी, गौडवाडी, मुसुचिवाडी, जुनेखेड, वाळवा, शिरगाव येथे कृष्ण नदीची पाणी पातळी वाढली होती. महापुराच्या भीतीने नदीकाठावरील लोकांनी स्थलांतर केले होते. गतवर्षीच्या महापुराची भीती लोकांच्या मनात कायम आहे. 

हेही वाचा - वादग्रस्त घनकचरा प्रकल्पाच्या अंतिम मान्यतेसाठी हालचालींना वेग...

परंतु काल सकाळपासून हळूहळू पाणी ओसरण्यास सुरवात झाली. काल सावकाश उतरणारे पाणी आज झपाट्याने उतरले. काही ठिकाणी पाणी नदीपात्रात गेले. त्यामुळे महापुराचा धोका टळला. महापूराची भिती घेतलेल्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. नवेखेड जुनेखेड रस्त्यावरील पाणी कमी झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water of krishna river decreased fastly in sangli