सांगलीत आयर्विन पुलावर पाणीपातळी 34.2 फुटावर

विष्णू मोहिते
Monday, 17 August 2020

सांगली, ः कोयना, चांदोली धरण पाणलोटात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार अतिवृष्टी सुरु आहे. वारण, कोयना नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढते आहे. आज दुपारी एक वाजेपर्यंत सांगलीत आयर्विन पुलावर पाणईपातळी 34.2 फुटावर पोहोचली होती. सायंकाळी सात वाजेपर्यंत पाणईपातळी वाढून ती 40 फुटावर जाण्याची शक्‍यता आहे. अलमट्टी धरणातून 2.5 लाख क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे सांगली महापालिकेसह नदीकाठावरील 104 गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुरपट्ट्यातील घरे, जनावरांचे गोठ्यांतून पशुधन वाचवण्याचे आवाहन केले आहे. 
कोयना धरणात 92.49 टी. एम. सी. पाणीसाठा असून सकाळी आठपर्यंत कोयना परिसरात 130, नवजाला 183 आणि महाबळेश्‍वर येथे 108 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. 56 हजार क्‍युसेकने विसर्ग सुरु आहे. सध्या तरी विसर्ग वाढवण्याची शक्‍यता कमी असली तरी पावसाचा जोर वाढल्यास जादाचा विसर्ग केला जाण्याची शक्‍यता आहे. कोयना धरणातून सांगली शहरात पाणी येण्यासाठी सर्वसाधारण 24 ते 28 तास लागतात. यामुळे वाढीव पाण्याचा विसर्गाचे पाणी सायंकाळी सात वाजेपर्यंत येणार आहे. यावेळी सांगलीची पाणी पातळी 40 फुटावर जाण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 19 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय गेल्या 24 तासात व आजअखेर पडलेला पाऊस असा- मिरज-9 (399), तासगाव- 14 (421), कवठेमहांकाळ- 10 (418.1), वाळवा-इस्लामपूर- 28 (397), शिराळा- 25 (799), कडेगाव- 14 (802), खानापूर-विटा 8 (481), आटपाडी-0 (348), जत-19 (319). 

कृष्णा नदीवरील विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये अशी- कृष्णा पूल कराड 27.09, बहे पूल-12.08, ताकारी पूल-41.01, भिलवडी पूल-38.03, आयर्विन पूल सांगली 34.2 व अंकली पूल -36.09, म्हैसाळ -43.3, राजापूर बंधारा- 47. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water level at Irwin Bridge in Sangli at 34.2 feet