सांगलीत कृष्णेची पाणीपातळी 38.10 फुटावर 

विष्णू मोहिते
Tuesday, 18 August 2020

सांगली ः कोयना धरण पाणलोटात काहीसा पाऊस कमी झाला असला तरीही दुपारी बारा वाजल्यापासून 55 हजार 958 क्‍युसेसने विसर्ग सुरु आहे. सांगलीत कृष्णानदीच्या पाणीपातळीत वाढ असली तरी कोयना पुल, कृष्णापूल, बहे , ताकारी पुलावरील पाणीपातळीने दम टाकला आहे. पाणीपातळी घटते आहे. सांगलीत आयर्विन पुलावर 38.10 फुट पाणीपातळी आहे. दुपारी चार वाजल्यापासून पाणीपातळी स्थिर होण्याची चिन्हे आहेत.

कोयना पाणलोटातील पाऊस, कृष्णानदीच्या पाणलोटात पावसाची उघडीपीमुळे पाणीपातळी सध्यस्थितीत 39 फुटापर्यंतच जाण्याची शक्‍यता आहे. वारणा धरणातूनही 14 हजार 486 क्‍युसेकने विसर्ग सुरु आहे. भिलवडीचा पुल पाण्याखाली गेला आहे. सांगलीत आयर्विन पुलावर पाणीपातळी 38.10 फुटावर पोहोचली आहे. जिल्ह्यात गेली 30 तास पावसाने विश्रांती घेतली आहे. कोयना धरणाचा पाणलोटात पावसाची घटला आहे.

कोयना पुल कराड येथे रात्री 2 वाजता 37.6 फुट पाणीपातळी होती. दुपारी 12 पर्यंत ती 35.3 फुटावर आली. कृष्णापुल कराड येथे 30.10 फुटावरून 28.1 फुटावर पाणी कमी झाले आहे. बहे पुलावर 14.7 फुटावरून 14.1 फुट अशी पातळी घटली आहे. ताकारी पुल येथे 47.1 फुटावरुन 46.5 फुटावर पातळी घटली. भिलवडी पुलावर 43 फुटावरुन 46 फुट पातळी झाली आहे. आयर्विनची पातळी 37.4 फुटावरुन 38.10 वर आहे. ती 39 फुटावर स्थिरावण्याची शक्‍यता आहे. 
.............. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The water level of Sangli Krishna at 38.10 feet