रूकडी रेल्वेपुलावर अद्यापही पाणी पातळी 52 फुटावर

सागर कुंभार
रविवार, 11 ऑगस्ट 2019

रुकडी - पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद आहे. रुकडी (ता. हातकणंगले) ते वळिवडे ( गांधीनगर ) या दरम्यानच्या पंचगंगा नदीवरील ब्रिटीशकालीन रेल्वेपुलाने धोक्याची पातळी ओलांडल्याने रेल्वे प्रशासनाने सर्व प्रकारची वहातूक थांबवली आहे.

आज (दि. ११) पुराचा सातवा दिवस असून, अजूनही पूराच्या पाण्याची पातळी ५२ फुटावर आहे. परंतू २००५ च्या पूरा वेळी ही पातळी ४५ फुटावर होती. म्हणजे अजूनही जवळपास सात फूट पाणी अधिक आहे.  

रेल्वे पूलाच्या पूर्वेस रूकडी गांव असून, या भागातील दगडी पूल परिसरात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला होता. हीच अवस्था रेल्वे पूलाच्या पश्चिमेस चिंचवाड गेट अलिकडील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला होता. दोन्ही बाजूंच्या रूळाखालील स्लीपर खालील खडी पूर्णपणे वाहून गेली आहे. आज रेल्वे प्रशासनाने ट्रॅक दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेतले आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने ज्ञानेश्वर आंधळे यांनी दिली. श्रावणलाल भील,  के. आर. डांगे, रूपसिंग राठोड, शंकर केसरकर,  रेल्वे सुरक्षा दलाचे जवान व जवळपास २०० रेल्वे कामगार युद्धपातळीवर काम करत आहेत.

दरम्यान रेल्वे, एसटी सेवा बंद असल्याने काही प्रवासी मिरजेहून चक्क पायी कोल्हापुरला येत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water level still stands at 52 feet on the Rukadi Railway bridge