esakal | "म्हैसाळ'चे पाणी बंदिस्त पाईपद्वारे मिळणार; एप्रिलअखेर काम पूर्ण शक्‍य

बोलून बातमी शोधा

The water of "Mahisal" will be available through a closed pipe; the work will be completed by the end of April}

जलसंपदा विभागाने कळंबी कालव्याचे 34 ते 42 किलोमीटर असे साडेसहा किलोमीटर अंतरात बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी दिले जाणार आहे.

paschim-maharashtra
"म्हैसाळ'चे पाणी बंदिस्त पाईपद्वारे मिळणार; एप्रिलअखेर काम पूर्ण शक्‍य
sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली ः जलसंपदा विभागाने कळंबी कालव्याचे 34 ते 42 किलोमीटर असे साडेसहा किलोमीटर अंतरात बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी दिले जाणार आहे. शेवटच्या टप्प्यातील जलवाहिन्या जोडण्याचे काम सुरू झाले आहे. एप्रिलअखेर हे काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. 

दुष्काळी भागाचा कायापालट करणाऱ्या म्हैसाळ योजनेतून पूर्व भागातील जत, सांगोला, मंगळवेढा तालुक्‍यातील शेती आता पाणीदार झाली. योजनेतील कळंबी कालव्यात समाविष्ट कांचनपूर, रसूलवाडी, सांबरवाडी, कवलापूरसह तासगाव तालुक्‍यातील कुमठे व धुळगाव हद्दीतील काही भाग आजवर पाण्यापासून वंचित राहिला होता. त्या भागाला सध्या पाणी देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

कळंबी कालव्याचे 1 ते 27 किलोमीटर आणि 34 किलोमीटरपर्यंतचे अस्तरीकरण पूर्ण केले आहे. त्यापुढे 42 किलोमीटरपर्यंतच्या साडेसहा कि.मी. अंतरात बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी मिळणार आहे. कृष्णा काठावरल्या मिरज तालुक्‍यातील कवलापूर, कांचनपूर, सांबरवाडी, काकडवाडी आणि तासगाव तालुक्‍यातील धुळगाव, कुमठेतील वंचित शेतीला चार महिन्यांत बंदिस्त पाईपद्वारे पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. चार महिन्यांत दोन हजार हेक्‍टर क्षेत्र पाणीदार होईल. 

वास्तविक हे योजनेचे शेपूट; तसेच शेतकऱ्यांच्याही मागणी अभावी येथे गेल्या दहा वर्षांत केवळ तीन-चार वेळा पाणी कालव्यातून सोडले. सोडलेले पाणीही पावसाळ्यात आल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नाही. 15 वर्षांपूर्वी जमिनींचे संपादन झाले. कालवा झाला मात्र, पाणी दुरापास्तच अशी स्थिती होती. 

कालव्याचे काम एप्रिलपर्यंत नक्की पूर्ण होईल

बंदिस्त पाईपलाईनद्वारेच पाणी पुरवठ्याचे शासनाचे धोरण राहणार आहे. कळंबी कालव्याचे काम एप्रिलपर्यंत नक्की पूर्ण होईल. तसा पाटबंधारे विभागाचे प्रयत्न आहे. 
- सूर्यकांत नलवडे, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ योजना 

संपादन : युवराज यादव