आम्ही धमक्यांना घाबरत नाही : फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 January 2020

फडणवीस आज अकलूज येथे आले होते. यावेळी त्यानी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. राज्यातून फडणवीस सरकार  सत्तेवरून पाय उतार झाल्यानंतर विरोधकांकडून आरोप होत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजू शेट्टी  बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे बाहेर काढू असं व्यक्तव्य केले आहे. त्यावर आज फडणवीस यांनी आम्ही विरोधकांच्या पोकळ धमक्यांना भीत नाही आमचा कारभार  जनतेने पाहिला आहे.

पंढरपुर (सोलापूर) : आम्ही कसल्या ही धमक्यांना घाबरत नाही जनतेला आमचा कारभार माहीत आहे. कोणाला काही ही आरोप करायचे असतील तर करावेत, आम्ही चौकशीला तयार आहोत, असं चोख प्रत्युत्तर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले आहे.

  फडणवीस आज अकलूज येथे आले होते. यावेळी त्यानी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. राज्यातून फडणवीस सरकार  सत्तेवरून पाय उतार झाल्यानंतर विरोधकांकडून आरोप होत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजू शेट्टी  बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे बाहेर काढू असं व्यक्तव्य केले आहे. त्यावर आज फडणवीस यांनी आम्ही विरोधकांच्या पोकळ धमक्यांना भीत नाही आमचा कारभार  जनतेने पाहिला आहे. कोणाला काही ही आरोप करायचे असतील तर करावेत आमच्या काळात कोणाची ही अडवणूक केली नाही .कोणते प्रोजेक्ट अडवले नाहीत ,कसलाही भ्रष्टाचार केला नाही कोणाला काय चौकशी  करायचे ते करा असा आम्ही चौकशीला तयार आहोत असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. यावेळी माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहित पाटील ,रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We are not afraid of anyone Fadnavis said