बंगळूरहून निघाले अन बेळगावात अडकले

We left Bangalore and got stuck in Belgaum
We left Bangalore and got stuck in Belgaum

बेळगाव : राजस्थानला जाण्यासाठी सोमवारी रात्री ते 101 जण बंगळूरहून पायी चालत निघाले. वाटेत त्यांना राजस्थान पसिंगचा ट्रक मिळाला. ट्रक चालकाला त्यांनी विनवणी केली. त्यांची व्यथा ऐकून ट्रक चालकाने त्याना राजस्थानला नेण्याची तयारी दाखवली. त्यांचा बेळगाव जिल्ह्यातील हिरेबागेवाडी पर्यंतचा प्रवास सुकर झाला. पण हिरेबागेवाडी येथील चेक पोस्टवर त्या ट्रकची तपासणी झाली. विनापरवाना प्रवास केल्याबद्दल त्या सर्वांना व ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले व बेळगावात आणले. येथील सीपीएड मैदानावर त्यांची चौकशी करण्यात आली, त्यांची आरोग्य तपासणीही झाली. त्यात एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आरोग्यधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्याशी संपर्क साधू्न व माहिती दिली. त्यांनतर तातडीने रुग्णवाहिका पाठवून त्या व्यक्तीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. यामुळे महापालिका अधिकारीही चांगलेच धास्तावले आहेत. ती व्यक्ती पॉजिटीव्ह आढळली तर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची भीती आहे. महापालिका आयुक्त के. एच. जगदीश यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सिपीएड मैदानावर जाऊन तेथील अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळी याना याबाबतची माहिती देऊन पुढील निर्णय घेण्याचे त्यांनी ठरविले. 

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर कर्नाटक राज्यात वास्तव्यास असलेले परप्रांतीय परतीच्या मार्गाला लागले. यासाठी कर्नाटक शासनाने ई पास सुविधा उपलब्ध करून दिली. रेल्वे विभागाने आशा परप्रांतीयांसाठी विशेष रेल्वे सुरू केली असली तरी अनेकांना त्याचा लाभ घेता आलेला नाही. शिवाय बेळगावात आलेल्या या राजस्थानी लोकांच्या मते राजस्थानासाठी रेल्वे सुरू करण्यात आलेली नाही. रोजगार नाही, पैसे नाहीत, जवळचे अन्न धान्यही संपले, त्यामुळे त्यांनी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. बंगळूर येथून राजस्थान पर्यंतचे अंतर सुमारे 2000 किमी आहे. पण वाटेत वाहन मिळेल या आशेने ते बंगळूर-पुणे महामार्गावरून निघाले. त्यांच्या सुदैवाने राजस्थानकडे निघालेला ट्रक त्यांना मिळाला. ते सर्व म्हणजे 101 जण त्या ट्रॅकमध्ये बसून निघाले. पुरुष, महिला, लहान मुलांचा तो गोतावळा बेळगावपर्यंत पोहोचला पण बेळगावात त्यांच्या प्रवासाला ब्रेक लागला. आता त्यांनाही क्वारणटाईन करून ठेवावे लागणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतील. शिवाय त्यांच्यातील कोरोना संशयितांचा अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. परराज्यातून बेळगावात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्या सर्वांना क्वारणटाईन करण्यासाठी प्रशासनाकडे जागा नाही. त्यात आता या 101 जणांची भर पडली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com