बेळगाव : पावसाची ओढ; शेतकऱ्यांच्या जीवाला घोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update farmer waiting for rain for sowing seed rice belgaum

बेळगाव : पावसाची ओढ; शेतकऱ्यांच्या जीवाला घोर

बेळगाव : मॉन्सूनला सुरवात झाली असली तरी पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. धूळवाफ पेरणी केलेल्या भाताची उगवण होणे कठीण झाले आहे. जमिनीत ओलावा नसल्याने भात बियाणे खराब होत असून कूपनलिका आणि विद्युत पंपाच्या साहाय्याने पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पाण्याची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

यंदा अवकाळी पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला होता. पेरणीपूर्व मशागत करण्यात आली. यावेळी मॉन्सूनचे लवकर व समाधानकारक आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर पावसाने ओढ दिली आहे. मध्यंतरी तुरळक पाऊस झाला. त्यानंतर पावसाने पूर्णपणे ओढ दिली आहे. परिणामी पावसाअभावी भात पीक उगवणी खुंटली आहे. पेरणी केलेल्या भातापैकी २५ टक्के भात उगवण झाली आहे. बहुतांश बियाणे खराब झाले आहे. त्यामुळे शेतकरी दुबार पेरणी करण्याच्या तयारीत आहेत.

पावसाने लवकर हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे. पाऊस नसल्यामुळे पिके वाचविण्यासाठी अनेक शेतकरी कूपनलिका आणि विहिरींचे पाणी देण्यासाठी धडपड करत आहेत. भातरोप लागवड करणारे शेतकरीही अडचणीत आले आहे. रोप घालावे की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे ते शेतकरी पाणी देऊन रोप लागवडीसाठी लागणाऱ्या भाताच्या बियाण्यांची पेरणी करत आहेत.

Web Title: Weather Update Farmer Waiting For Rain For Sowing Seed Rice Belgaum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top