बेवारस मृतदेहांची वेबसाइट 

लुमाकांत नलवडे - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 9 जानेवारी 2017

कोल्हापूर - घरातून निघून गेलेले परत आलेच नाहीत... बेवारस म्हणून त्यांचा कोठे अंत्यविधी तर झाला नाही ना? याची माहिती आता कोणालाही, कोठूनही मिळू शकणार आहे. यासाठी wwwsecondinninghomes.com ही वेबसाइट तयार केली आहे. यासाठी मानवसेवा, सेकंड इनिंग होम्स या संस्थेने पुढाकार घेतला आहे. संस्थेने आजपर्यंत जेवढे अंत्यसंस्कार केले आहेत, त्याची माहिती या वेबसाइटवर उपलब्ध केली आहे. वेबसाइटमुळे मृत्यूनंतरही बेवारस असलेल्यांना त्यांच्या नातेवाइकांपर्यंत पोचणे सोपे जाणार आहे. 

कोल्हापूर - घरातून निघून गेलेले परत आलेच नाहीत... बेवारस म्हणून त्यांचा कोठे अंत्यविधी तर झाला नाही ना? याची माहिती आता कोणालाही, कोठूनही मिळू शकणार आहे. यासाठी wwwsecondinninghomes.com ही वेबसाइट तयार केली आहे. यासाठी मानवसेवा, सेकंड इनिंग होम्स या संस्थेने पुढाकार घेतला आहे. संस्थेने आजपर्यंत जेवढे अंत्यसंस्कार केले आहेत, त्याची माहिती या वेबसाइटवर उपलब्ध केली आहे. वेबसाइटमुळे मृत्यूनंतरही बेवारस असलेल्यांना त्यांच्या नातेवाइकांपर्यंत पोचणे सोपे जाणार आहे. 

या ना त्या कारणामुळे आबालवृद्धांपर्यंत कोणीही हरविले जाऊ शकते. पोलिस ठाण्यात याची नोंद "मिसिंग', काही ठिकाणी "अपहरण' म्हणून होते. त्यानंतर नातेवाइकांकडे शोध घ्या, असा सल्ला पोलिसांकडून दिला जातो. सर्व पोलिस ठाण्यांकडे याची माहिती पाठविली जाते; मात्र गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असेल तरच व्यापक प्रमाणात शोध होतो, अन्यथा संबंधित व्यक्ती पुढे बेवारस ठरते. अशाच बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम सेकंड इनिंग ही संस्था करते. कोणताही मृतदेह मिळाला की त्यानंतर किमान तीन दिवस त्यांच्या नातेवाइकांची वाट पाहिली जाते. वृत्तपत्रांतून संबंधितांची माहिती प्रसिद्ध केली जाते. प्रतिसाद मिळाला नाही, तर संबंधित मृतदेह बेवारस असल्याचे गृहीत धरून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. 

अनेक वेळा केवळ माहिती नसल्यामुळे व्यक्तींवर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार होतात किंबहुना अंत्यसंस्कार झाल्यानंतरही संबंधित व्यक्ती बेवारस भटकत असेल असाच गृह त्यांच्या नातेवाइकांत असतो. यालाच पूर्णविराम मिळण्यासाठी सेकंड इनिंगने पुढाकार घेतला आहे. वेबसाइटवर बेवारसांची छायाचित्रे अपलोड केली जातात. काही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यासारखी नसतात तेव्हा संबंधित व्यक्तीचा केवळ चेहरा दिला जातो. आजपर्यंत शंभराहून अधिक छायाचित्रे या साइटवर अपलोड केली आहेत. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ही छायाचित्रे साइटवरून काढून टाकली जातात; मात्र त्याचा संपूर्ण डाटा या संस्थेकडे उपलब्ध आहे. मनीषा पाटील यांनी वेबसाइटचे "होमपेज' हृदयस्पर्शी तयार केले आहे. एकमेकांचे हात गुंफलेले आणि त्यामध्ये मृतदेहाच्या पायाच्या अंगठ्याला त्याचे लेबल लावलेला "लोगो' संस्थेच्या संपूर्ण कामाची माहिती देणारा आहे. किशोर नैनवाणी, शहाजी माळी, रघुनाथ कांबळे यांच्यासह सुमारे पंधरा जणांकडून संस्थेचे काम सुरू आहे. 

तीन महिन्यांत सात हजारांची व्हिजिट 
गेले तीन महिने ही वेबसाइट सुरू झाली आहे. वेबसाइटला आजपर्यंत तब्बल सात हजारांहून अधिक जणांनी व्हिजिट दिली आहे. आजपर्यंत अनेक कार्पोरेट कंपन्यांच्या, प्रॉडक्‍टच्या वेबसाइट उपलब्ध आहेत; पण बेवारस मृतदेहांची तीही खासगी संस्थेने तयार केलेली बहुदा देशात पहिलीच वेबसाइट असण्याची शक्‍यता आहे. 

पोलिसाच्या नावावर मृतदेह 
रेल्वे रुळवर, पाण्यात, नदीत, दरीत पडलेले मृतदेह बाहेर काढल्यावर त्याची नोंद पोलिस ठाण्यातील एका पोलिसाच्या नावावर होते. त्यानंतर त्या पोलिसाने संबंधित व्यक्तीचे वारस शोधून काढणे आवश्‍यक असते. नातेवाईक मिळालेच नाहीत तर त्याचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी त्या पोलिस कर्मचाऱ्यावर असते. त्यानंतर त्याची फाइल (इत्तंभूत माहिती) तयार करावीच लागते.

Web Title: Website abandoned bodies