
24 एप्रिलला माझ्या लग्नाच्या 17 वा वाढदिवस. त्यानिमित्त क्रिकेटच्या प्रेमामुळे काहीतरी वेगळे करायचे म्हणून सलग पाच तास क्रिकेट नॉकिंग करण्याचा विश्वविक्रम केला, असे प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक डॉ. अर्जुन शिरसाठ (वय 43) यांनी सांगितले.
नगर : लॉकडाउनमुळे गेल्या महिन्याभरापेक्षाही जास्त काळ घरातच बसून होतो. आलेले रूग्ण तपासायचे, आणि उरलेला वेळ वाचन, मनन, यातच घालायचा. व्यायामही घरातच, लहानपणापासून क्रिकेट खेळची फार आवड मात्र शहरात लॉकडाउन असल्याने तो खेळही खेळता येत नव्हता. 24 एप्रिलला माझ्या लग्नाच्या 17 वा वाढदिवस. त्यानिमित्त क्रिकेटच्या प्रेमामुळे काहीतरी वेगळे करायचे म्हणून सलग पाच तास क्रिकेट नॉकिंग करण्याचा विश्वविक्रम केला, असे प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक डॉ. अर्जुन शिरसाठ (वय 43) यांनी सांगितले.
गुगलवर ह्या प्रकारात कुठलाही विक्रम असल्याची नोंद तपासली असता त्यांना ती कुठेही आढळली नाही.
त्यामुळे नवीन विश्वविक्रम करण्याच्या करण्याच्या हेतूने ते जास्तीत जास्त वेळ खेळायचा व जास्तीत जास्त शॉट्स खेळण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी घराच्या छताला सहा फूट उंचीची दोरी बांधली, त्या दोरीला क्रिकेटचा बॉल लावला, या बॉलला नॉकींग करण्यासाठी त्यांनी एक किलो आठशे ग्रॅम वजनाची बॅट वापरत पाच तास चार सेंकदात 11 हजार तीनशे शॉटस् खेळले.
हा सर्व कार्यक्रमाचे नियोजन करताना जास्तीत जास्त वेळा त्या शॉट्स खेळताना त्यांचे सलग चित्रीकरण व्हावे व त्याचा पुरावा व्हावा यासाठी छायाचित्रकार सागर इंगळे व अविनाश म्हसे यांनी मदत केली तसेच खेळलेल्या शॉट्सची मोजदाद व्हावी म्हणून माझी पत्नी सुचेता व मुलगा अभिषेक यांनी मदत केली.
अशाप्रकारे शुक्रवारी (ता. 24) त्यांनी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी ह्या आपल्या विश्वविक्रमाला सुरवात केली. न थांबता,अविरत त्यांनी हा उपक्रम दुपारी 4 वाजून 30 मिनिटे व 4 सेकंदापर्यंत हा एक अनोखा विश्वविक्रम केल्याचे नेत्रशल्य चिकित्सक डॉ. अर्जुन शिरसाठ यांनी सांगितले.