शिंगणापुरात कावड यात्रेचे स्वागत पण भाविक दोघेच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

चैतन्य माया दिंडीचे आज शनिशिंगणापुरात आगमन झाल्यानंतर विनायक घनवट या भक्ताने दिंडीचे 
स्वागत केले.

सोनई : गुढीपाडव्यानिमित्त प्रवरानगर ते मच्छिंद्रनाथगड, मायंबा कावड व पायी दिंडी सोहळ्याचे शनिशिंगणापुरात स्वागत करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन या दिंडीत दोनच भक्तांचा सहभाग होता. 

दरवर्षी प्रवरानगर येथील चैतन्य अस्थान आश्रमातून शंभर भक्त कावड व निशाण घेऊन मढी व मायंबाची 
पायी दिंडी नेत होते. बुधवारी (ता. 18) दत्तात्रेय विखे, श्‍यामराव म्हस्के, भरत म्हस्के यांनी इतर सर्व भक्तांचा सहभाग रद्द करून योगी दीनानाथ महाराज व कृष्णा पवार या दोघांचीच पायी दिंडी रवाना केली. 

चैतन्य माया दिंडीचे आज शनिशिंगणापुरात आगमन झाल्यानंतर विनायक घनवट या भक्ताने दिंडीचे 
स्वागत केले. दोन भक्तांची दिंडी मंगळवारी (ता. 24) अमावास्येला मढी येथे पोचणार आहे. येथे अभिषेक करून निशाण मढी व मायंबा समाधिस्थळाला स्पर्श करणार आहे. मंदिराला प्रदक्षिणा 
घालून दिंडीची सांगता होणार आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Welcome to Kawad Yatra in Shinganapur but both devotees

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: